इराणचा कुवेतवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा भीषण मारा; प्रत्युत्तरात अमेरिकेचे 'सेल्फ-डिफेन्स' हल्ले तर इस्रायलकडून हिजबुल्लाहवर बॉम्बवर्षाव

Iran Kuwait Missile Attack: सोमवारच्या पहाटे इराणने कुवेतवर अचानक मोठा हल्ला चढवत एकामागून एक क्षेपणास्त्रे आणि आत्मघाती ड्रोनचा वर्षाव केला.
Iran Kuwait Missile Attack
Iran Kuwait Missile AttackDainik Gomantak
Published on
Updated on

Iran Kuwait Missile Attack: मध्य पूर्वेमध्ये पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला असून परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली. सोमवारच्या पहाटे इराणने कुवेतवर अचानक मोठा हल्ला चढवत एकामागून एक क्षेपणास्त्रे आणि आत्मघाती ड्रोनचा वर्षाव केला. या भीषण हल्ल्यानंतर संपूर्ण कुवेतमध्ये युद्धकालीन सायरन वाजू लागले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. कुवेतच्या सैन्याने तातडीने आपले एअर डिफेन्स सिस्टीम सक्रिय केले. शत्रूच्या बाजूने येणारी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेतच नष्ट करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. इराणच्या या अनपेक्षित आक्रमणामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी खळबळ उडाली.

या वाढत्या तणावाच्या दरम्यान, अमेरिकन सेंट्रल कमांडने इराणवर लष्करी हल्ले केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. CENTCOM ने जारी केलेल्या निवेदनानुसार, अमेरिकेने इराणच्या आक्रमक कारवायांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हे 'सेल्फ-डिफेन्स' हल्ले केले. काही वेळापूर्वी इराणने आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात उड्डाण करत असलेले अमेरिकेचे अत्याधुनिक 'MQ-1' ड्रोन पाडले, ज्याचा बदला म्हणून अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य करत ही मोठी कारवाई केली. यामुळे आता अमेरिका (America) आणि इराणमधील थेट संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Iran Kuwait Missile Attack
US Strikes Iran: अमेरिकेकडून इराणवर हवाई हल्ला; ट्रम्प यांच्या न्यूक्लियर डीलच्या दाव्यादरम्यान मिडल ईस्टमध्ये पुन्हा तणाव

दुसरीकडे, अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चा पूर्णपणे अपयशी ठरल्याचे स्पष्ट होताच इस्रायलनेही आक्रमक पाऊल उचलले. इस्रायलने लेबनानमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर आपले हल्ले कमालीचे तीव्र केले. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने रविवारी लेबनानच्या हद्दीत जोरदार हवाई हल्ले केले. या बॉम्बवर्षावात हिजबुल्लाहचे अनेक तळ आणि इमारती जमीनदोस्त झाल्या असून मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचे वृत्त आहे.

Iran Kuwait Missile Attack
US Iran Tension: इराणचा अमेरिकेला अल्टिमेटम! 5 अटी मान्य करा तरच चर्चा, अण्वस्त्रांच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलं; युद्धाच्या छायेत जगाचा श्वास रोखला

इराणने (Iran) कुवेतला लक्ष्य करणे, अमेरिकेने इराणवर केलेले प्रत्याक्रमण आणि इस्रायलने लेबनानमध्ये उघडलेली आघाडी, या तिहेरी संघर्षामुळे संपूर्ण आखाती प्रदेशात महायुद्धाचे ढग गडद झाले असून जागतिक शांतता धोक्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com