Iran: इराणचे सर्वात शक्तिशाली धार्मिक नेते अयातुल्ला अब्बास यांच्या हत्येचा व्हिडिओ आला समोर

पश्चिम आशियाई देश इराणमधील प्रभावशाली धर्मगुरू अयातुल्ला अब्बास अली सुलेमानी यांची हत्या करण्यात आली आहे.
Abbas Ali Soleimani Murder
Abbas Ali Soleimani MurderDainik Gomantak
Published on
Updated on

Abbas Ali Soleimani Murder: पश्चिम आशियाई देश इराणमधील प्रभावशाली धर्मगुरू अयातुल्ला अब्बास अली सुलेमानी यांची हत्या करण्यात आली आहे. 75 वर्षीय सुलेमानी हे देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे माजी प्रतिनिधी होते. बुधवार, 26 एप्रिल रोजी त्याला एका सशस्त्र हल्लेखोराने सुलेमानी यांना लक्ष्य करत त्यांची हत्या केली.

दरम्यान, सुलेमानी यांच्या हत्येचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

या व्हिडिओमध्ये हल्लेखोर त्यांच्यावर हल्ला करताना दिसत आहे. इराणची अधिकृत वृत्तसंस्था IRNA ने या घटनेला दुजोरा दिला आहे. वृत्तसंस्था IRNA ने बुधवारी एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने याबाबत माहिती दिली आहे. "आज सकाळी सशस्त्र हल्ल्यात अयातुल्ला अब्बास अली सुलेमानी ठार झाले." एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरालाही घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे.

Abbas Ali Soleimani Murder
Operation Kaveri in Sudan: ऑपरेशन कावेरी! सुदानमधून 246 भारतीय नागरिक मुंबईत दाखल, प्रवाशी म्हणाले 'मोदी...'

सुलेमानी अयातुल्ला अली खमेनी यांचे होते खास

सुलेमानी हे इराणच्या सर्वोच्च नेत्याची निवड करणाऱ्या तज्ञांच्या सभेचे सदस्य होते. ते देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांचे विशेष प्रतिनिधीही होते. मध्य इस्फहान प्रांतातील काशान आणि सिस्तान-बलुचिस्तानच्या आग्नेय प्रांतातील झहेदान या शहरांमध्ये शुक्रवारच्या नमाजचे नेतृत्व करणारे ते इमाम देखील होते.

जिहादी हल्ल्यात दोन मौलवीही मारले गेले

इराणच्या उत्तर प्रांतातील माझंदरन येथील बाबोलसर शहरात त्याच्यावर हल्ला झाल्याचे IRNA ने आपल्या अहवालात म्हटले आहे. मागील महिन्याच्या सुरुवातीला, मशहाद या ईशान्येकडील तीर्थक्षेत्र शहरात झालेल्या एका संशयित जिहादी हल्ल्यात दोन मौलवी ठार आणि अन्य जखमी झाले. तसेच आता सुलेमानी मारला गेला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com