Operation Kaveri in Sudan: ऑपरेशन कावेरी! सुदानमधून 246 भारतीय नागरिक मुंबईत दाखल, प्रवाशी म्हणाले 'मोदी...'

सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्करी दलांमध्ये सत्तासंघर्ष सुरू आहे.
Operation Kaveri
Operation Kaveri

Operation Kaveri in Sudan: सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारताचे ऑपरेशन कावेरी सुरू आहे. गुरुवारी (27 एप्रिल) सुदानमधून 246 भारतीय नागरिकांना घेऊन हवाई दलाचे विमान मुंबईत पोहोचले. अशी माहिती परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दिली आहे.

सुरक्षित भारतात पोहचलेल्या अनेक प्रवाशांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. गृहयुद्धाचा सामना करणाऱ्या सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्करी दल आरसीएफ यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे.

सुदानहून भारतात परतलेल्या एका वृद्ध महिला प्रवाशाने भावूकपणे आपल्या भावना व्यक्त केल्या. "भारत एक महान देश आहे. पंतप्रधान मोदी हजार वर्षे जगावे", आणखी एका भारतीय निशा मेहतानेही पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. आम्हाला आमच्या देशात परतताना खूप आनंद होत आहे.

आतापर्यंत किती भारतीय परतले?

भारतीय हवाई दलाच्या दोन वाहतूक विमानांद्वारे 256 भारतीयांना सुदानमधून बाहेर काढण्यात आले होते.

INS सुमेधा या नौदलाच्या जहाजातून 278 भारतीयांना बाहेर काढण्यात आले. त्यानुसार आतापर्यंत सुदानमधून बाहेर काढण्यात आलेल्या भारतीय नागरिकांची संख्या 780 झाली आहे.

Operation Kaveri
Air India Hiring: एअर इंडियात पायलट होण्याची संधी, कंपनीकडून 1,000 पादासाठी जाहिरात प्रसिद्ध

विमानाने मुंबईला रवाना होण्याच्या काही मिनिटांपूर्वी, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी ट्विट केले, "जेद्दाहमधून भारतीयांना वेगाने परत आणण्याचे आमचे प्रयत्न सार्थकी लागले आहेत. IAF C17 Globemaster द्वारे 246 भारतीय लवकरच मुंबईत पोहोचतील.

Operation Kaveri
Free IPL Match: मोफत, मोफत... आयपीएलचा प्रत्येक सामना पाहा विनामूल्य; TV, DTH गरज नाही

सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्करी दलांमध्ये सत्तासंघर्ष सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या लढाईत 400 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दोन्ही बाजूंनी 72 तासांच्या युद्धविरामावर सहमती दिल्यानंतर, भारताने तेथे अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न वाढवले. यानंतर ऑपरेशन कावेरी सुरू झाले, मात्र युद्धबंदीच्या काळातही तेथे हिंसाचार सुरूच होता.

या मुद्द्यावर नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. यामध्ये त्यांनी सुदानमधून 3000 हून अधिक भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आपत्कालीन तयारीच्या सूचना दिल्या.

यापूर्वी एस. जयशंकर यांनी सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि इजिप्तमधील त्यांच्या समकक्षांशी भारतीयांच्या सुरक्षित बाहेर काढण्याबाबत चर्चा केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com