Interpol Conference: दिल्लीतील प्रगती मैदानावर इंटरपोलची परिषद आयोजित करण्यात आली आहे, जी आजपासून म्हणजेच मंगळवारपासून सुरु झाली आहे. इंटरपोलची 90 वी परिषद 18 ते 21 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. परिषदेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने झाली. मिळालेल्या माहितीनुसार, इंटरपोलच्या 195 सदस्य देशांचे शिष्टमंडळ या बैठकीत सहभागी होत असून त्यात पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
दरम्यान, परिषदेच्या पहिल्या दिवशी पाकिस्तानी अधिकाऱ्याला दहशतवादी हाफिज सईद आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्यावरील प्रश्नांवरुन निघून जावे लागले. एका पत्रकाराने पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे (एफआयए) महासंचालक मोहसिन बट यांना विचारले की, 'तुम्ही हाफिज सईद (Hafiz Saeed) आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला (Dawood Ibrahim) भारताकडे कधी सोपवणार. यावर त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला. पत्रकाराच्या प्रश्नावर मोहसीन बट इकडे-तिकडे पाहू लागले.'
दुसरीकडे, ही परिषद इंटरपोलची सर्वोच्च प्रशासकीय संस्था आहे. कामकाजाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी वर्षातून एकदा या बैठकीचे आयोजन करण्यात येते. तब्बल 25 वर्षांनंतर भारतात (India) इंटरपोल परिषद होत आहे. शेवटची परिषद 1997 मध्ये झाली होती.
तसेच, भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या अनुषंगाने 2022 मध्ये नवी दिल्ली येथे इंटरपोल परिषद आयोजित करण्याचा भारताचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला. ही परिषद भारतातील कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थेतील सर्वोत्कृष्ट कार्यपद्धती संपूर्ण जगाला दाखवण्याची संधी देते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, इंटरपोलचे अध्यक्ष अहमद नासेर अल रायसी आणि महासचिव जुर्गन स्टॉक, सीबीआयचे संचालकही उपस्थित आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.