अमेरिकी सैन्याची मोठी कारवाई, ISIS म्होरक्या अबू इब्राहिम अल-हाशिम अल-कुरेशी ठार

यूएस काउंटर-टेररिझम स्पेशल फोर्सने ईशान्य सीरियामध्ये (syria) कारवाईदरम्यान ISIS म्होरक्या अबू इब्राहिम अल-हाशिम अल-कुरेशीला ठार केले आहे.
Syria
SyriaDainik Gomantak
Published on
Updated on

सीरियातील दहशतवादविरोधी कारवाईत अमेरिकन सैन्याने ISIS म्होरक्या अबू इब्राहिम अल-हाशिम अल-कुरेशीला ठार केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. राष्ट्राध्यक्ष जो बिडेन म्हणाले की, काल रात्री वायव्य सीरियामध्ये अमेरिकन लष्करी सैन्याने अमेरिकन लोकांचे आणि आमच्या मित्र देशांचे संरक्षण करण्यासाठी आणि जगाला सुरक्षित करण्यासाठी दहशतवादविरोधी मोहीम यशस्वीपणे राबवली, ज्यात अबू इब्राहिम अल-हाशिम अल कुरेशीचा समावेश होता. (ISIS leader Abu Ibrahim alHashim al Qureshi was killed)

Syria
Afghanistan: तालिबानला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळणार?

दरम्यान, ISIS च्या प्रमुखाचा खात्मा केल्यानंतर त्यांनी सर्व सशस्त्र दलांचे आभार मानले. त्याचबरोबर बायडन पुढे म्हणाले, यशस्वी ऑपरेशननंतर सर्व अमेरिकन लष्कर सुखरुप परतले आहेत. उत्तर सीरियातील इदलिब प्रांतात अमेरिकन सैन्याने केलेल्या या कारवाईत सहा मुलांसह किमान 13 जण ठार झाल्याची माहिती आहे. युद्धामुळे विस्थापित झालेले हजारो लोक या रात्रीच्या कारवाईत अमेरिकन सैन्याने लक्ष्य केलेल्या इमारतीत राहत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Afghanistan Pakistan Border Tension Drone Strike
Sikh Couple Killed In Pakistan Gurdwara Mardan
Times Square shooting during NBA celebration
Thierry Henry Criticism of Cristiano Ronaldo
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com