Indian Students: अमेरिकेतील ॲरिझोनात दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू; कुटुंबीयांचे भारत सरकारकडे भावनिक आवाहन!

America Car Accident: अमेरिकेतून भारतीयांसाठी पुन्हा एकदा वाईट बातमी आली आहे. अमेरिकेत दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
America Car Accident
America Car AccidentDainik Gomantak

America Car Accident: अमेरिकेतून भारतीयांसाठी पुन्हा एकदा वाईट बातमी आली आहे. अमेरिकेत दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. ॲरिझोनामधील लेक प्लेझंटजवळ दोन कारमध्ये जोरदार टक्कर झाली, ज्यात भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, 19 वर्षीय निवेश मुक्का आणि 19 वर्षीय गौतम पारसी अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. दोन्ही विद्यार्थी भारतीय असून अमेरिकेत त्यांची आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून नोंदणी होती.

कार दरम्यान टक्कर

पेओरिया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य महामार्ग 74 च्या अगदी उत्तरेकडील कॅसल हॉट स्प्रिंग्स रोडवर 20 एप्रिल रोजी संध्याकाळी 6:18 वाजता दोन कारमध्ये टक्कर झाली. या अपघातात (Accident) दोन्ही कारचे चालक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

America Car Accident
America Crime: 41 सेकंदात 100 राऊंड फायरिंग... सीट बेल्ट न लावलेल्या व्यक्तीचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू

हे विद्यार्थी तेलंगणातील रहिवासी होते

मिळालेल्या माहितीनुसार, निवेश मुक्का हा तेलंगणातील (Telangana) करीमनगर जिल्ह्यातील हुजुराबादचा रहिवासी होता तर गौतम पारसी हा जानगाव जिल्ह्यातील स्टेशन घनपूरचा रहिवासी होता. दोघेही ॲरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होते. अपघात झाला त्यावेळी दोघेही मित्रांसमवेत विद्यापीठातून घरी परतत होते. याचदरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने त्यांच्या कारला धडक दिली. दोन्ही विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी भारत सरकारकडे मृतदेह मायदेशात आणण्याची विनंती केली आहे.

America Car Accident
America China Tension: चीनी विद्यार्थ्यांना अमेरिकेतून हाकललं जातयं; ड्रॅगनचा आरोप

याआधी नुकतेच अमेरिकेतील आर्लिंग्टनमध्ये एका घरात गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. या गोळीबारानंतर मोठा स्फोटही झाला होता. यानंतर पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या सर्व रहिवाशांना त्यांच्या घरात राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलिसांचे म्हणणे होते की, ही घटना ब्लूमाउंटमधील एन बर्लिंगस्ट्रीटच्या 800 ब्लॉकमध्ये घडली.

पोलिसांनी सांगितले की, अधिकारी निवासस्थानावर शोध वॉरंट बजावण्याचा प्रयत्न करीत आहेत. एका संशयिताने घरात अनेक राऊंड गोळीबार केल्याने स्फोट झाला. दोन मैल दूरवरुन स्फोटाचा आवाज ऐकून तो घटनास्थळी पोहोचल्याचे एका स्थानिक नागरिकाने सांगितले.

पोलिसांनी पुढे सांगितले की, स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. घटनेनंतर लगेचच पोलिसांनी आजूबाजूची काही घरे रिकामी केली आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यास सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com