America China Tension: चीनी विद्यार्थ्यांना अमेरिकेतून हाकललं जातयं; ड्रॅगनचा आरोप

Manish Jadhav

अमेरिका आणि चीन यांच्यात पुन्हा तणाव

अमेरिका आणि चीन यांच्यातील आर्थिक स्तरावरील संघर्ष कोणापासून लपून राहिलेला नाही. दोन्ही देश जशी संधी मिळेल तशी एकमेकांची गय करत नाहीत. हा झाला आर्थिक आघाडीवरील संघर्ष.

America China Tension | Dainik Gomantak

दोन्ही देशांचा राजकीय स्तरावर संघर्ष

राजकीय स्तरावरही दोन्ही देशांदरम्यान काही नवे नाही. राजकीय स्तरावरही दोन्ही देश वेळोवेळी आपली ताकद दाखवतात. दोन्ही देशांचे राजकीय प्रतिनिधी एकमेकांविषयी वक्तव्ये करुन राळ उडवून देतात.

America China Tension | Dainik Gomantak

चीनी विद्यार्थांना अमेरिकेतून बाहेर काढले जातेय

यातच आता, अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ले वाढले असतानाच चीन विद्यार्थ्यांना निशाणा बनवलं जात असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. अमेरिका आपल्या विद्यार्थ्यांना जबरदस्तीने देशातून बाहेर काढत असल्याचा आरोप चीनने केला आहे.

Chinese Student | Dainik Gomantak

चिनी विद्यार्थ्यांबरोबर जबरदस्ती

बीजिंगने सोमवारी सांगितले की, अमेरिका कोणत्याही वैध पुराव्याशिवाय चिनी विद्यार्थ्यांना जबरदस्तीने हद्दपार करत आहे.

Chinese Student | Dainik Gomantak

चीन सरकारची प्रतिक्रिया

दरम्यान, चीनने आपल्या नागरिकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यकती सर्व पावले उचलण्याचा इशारा दिला आहे. चीनी राष्ट्राध्यक्षाचे प्रवक्ते माओ निंग यांनी राजधानी बीजिंगमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

Xi Jinping | Dainik Gomantak

अमेरिकेवर गंभीर आरोप

ते म्हणाले की, 'अमेरिका राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर अतिशयोक्ती करत आहे. तसेच, वैध पुराव्याशिवाय चिनी विद्यार्थ्यांचे व्हिसा मनमानीपणे रद्द करण्यात आले. त्यांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आणि जबरदस्तीने हद्दपार करण्यात आले.'

Xi Jinping | Dainik Gomantak

चीनी नागरिकांच्या हिताचं रक्षण

चीनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, चीन आपल्या नागरिकांच्या कायदेशीर हक्क आणि हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलेल. अमेरिकेने हा प्रकार ताबडतोब थांबवावा.

Xi Jinping | Dainik Gomantak
CJI Chandrachud | Dainik Gomantak