भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चीनला परतण्याचा मार्ग मोकळा

चीन परराष्ट्र मंत्रालयाने परतण्याची केली विनंती
China student
China student Dainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली : गेल्या दोन ते अडीच वर्षाहून अधिक काळ भारतासह संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोना संसर्गाचा सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. यामूळे जगभरात जीवित आणि अर्थिक हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. तसेच शिक्षण क्षेत्रही याला अपवाद राहिलं नाही. मात्र भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चीनला परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Indian students can return to China for education)

China student
‘घोस्ट ऑफ कीव’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या युक्रेनियन पायलटचा मृत्यू, 'मरण्यापूर्वी...'

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी बिजिंगमध्ये पत्रकार परिषद घेतली आहे. त्यांनी यावेळी सांगितलं की, “शिक्षणासाठी चीनमध्ये परत येऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला आमचा देश खूप महत्त्व देत आहे. इतर देशातील विद्यार्थ्यांची परत चीनमध्ये येण्याची प्रक्रिया आणि त्यांचे अनुभव आम्ही भारत सरकारशी शेअर केले जात आहेत. भारतीय विद्यार्थ्यांच्या परतीचं काम सुरू झालं आहे. भारताला फक्त अशाच विद्यार्थ्यांची यादी द्यावी लागेल ज्यांना प्रत्यक्षात चीनला परत यायचं आहे.” असं ही ते यावेळी म्हणाले.

China student
हौथी बंडखोरांच्या कैदेतून सात भारतीयांसह 12 जणांची सुटका, UN ने मानले आभार

असे असले तरी चीनमध्ये एकाच दिवसात 20 हजार ओमिक्रॉन बाधित आढले असून या महासाथीच्या आजाराने चीनच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. चीनमध्ये कोरोना ओमिक्रॉन संसर्गाची लाट आली आहे. त्यामुळे चीन सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. चीनमधील सर्वात मोठे शहर असलेल्या शांघाईमध्ये तीन आठवड्यांपासून लॉकडाऊन लागू केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com