हौथी बंडखोरांच्या कैदेतून सात भारतीयांसह 12 जणांची सुटका, UN ने मानले आभार

हौथी बंडखोरांच्या ताब्यातून सात भारतीय खलाशांसह परदेशी नागरिकांची (Citizens) अखेर सुटका झाली आहे.
Huthi Rebels
Huthi RebelsDainik Gomantak
Published on
Updated on

हौथी बंडखोरांच्या ताब्यातून सात भारतीय खलाशांसह परदेशी नागरिकांची अखेर सुटका झाली. त्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांच्या विशेष दूताने आभारही मानले. 2 जानेवारीपासून येमेनमध्ये हौथींनी ताब्यात घेतलेल्या सात भारतीय नाविकांच्या सुटकेसाठी ओमान आणि इतर पक्षांचे भारताने (India) आभार मानले. रविवारी हौथी-नियंत्रित राजधानी सानामधून सुटका करण्यात आलेल्या परदेशी नागरिकांमध्ये भारतीयांचा समावेश होता. गेल्या तीन महिन्यांपासून भारतीय नागरिक हौथी बंडखोरांच्या कैदेत होते. (Twelve people including seven Indians have been released from captivity by Huthi rebels)

Huthi Rebels
अमेरिकेतून कुरियरने पाठवले अमली पदार्थ मुंबई NCBने केले जप्त

"आम्ही इथिओपिया, भारत, इंडोनेशिया (Indonesia), फिलीपिन्स, म्यानमार आणि यूकेमधील 12 परदेशी नागरिकांच्या सुटकेचे स्वागत करतो, ज्यांना हौथी बंडखोरांनी ताब्यात घेतले होते." फरहान हक म्हणाले, "आम्ही ओमान आणि सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) प्रयत्नांसाठी आभार मानतो." कैद्यांची सुटका करण्यासाठी विशेष दूत कार्यालयासोबत त्यांची भागीदारी सुरु ठेवण्यासाठी पक्षांना प्रोत्साहित करत असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

सात नागरिक लवकरच भारतात परतणार

परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सांगितले की, भारतीय वंशाचे नागरिक रविवारी मस्कतला पोहोचले. त्यामुळे ते लवकरच भारतात परततील अशी अपेक्षा आहे. मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, '' 2 जानेवारीपासून येमेनमध्ये नजरकैदेत असलेल्या सात भारतीय खलाशांची सुटका करण्यात आल्याचा भारत सरकारला आनंद आहे. सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत होतो. त्यासाठी आम्ही ओमानसह सौदी अरेबियाच्या संपर्कात होतो.''

परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, 'भारतीय शिष्टमंडळाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतही हा मुद्दा उपस्थित केला होता. भारतीय खलाशांची सुटका केल्याबद्दल भारत सरकार सर्व संबंधितांचे, विशेषतः ओमान सरकारचे आभार मानते.'

Huthi Rebels
पाकिस्तानमध्ये 18-18 तास बत्ती गुल, उद्योगांना फटका

ओमानाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारतीयांच्या सुटकेची माहिती दिली

ओमानचे परराष्ट्र मंत्री बद्र अल्बुसैदी यांनी रविवारी भारतीयांसह 12 परदेशी नागरिकांच्या सुटकेची पुष्टी केली. ओमानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, 12 लोकांना ओमान रॉयल एअर फोर्सच्या विमानाने मस्कतला नेण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com