Indian Passport: भारतीय पासपोर्टची रँकिंग घसरली; आता व्हिसाशिवाय फक्त 62 देशांमध्ये जाता येणार!

Visa Free Countries For Indian Passport: जगभरात फिरण्यासाठी पासपोर्ट आवश्यक असतो. शक्तिशाली पासपोर्ट त्या देशातील नागरिकांना व्हिसाशिवाय विविध देशांमध्ये जाण्यास मदत करतो.
Indian Passport
Indian PassportDainik Gomantak
Published on
Updated on

Visa Free Countries For Indian Passport: जगभरात फिरण्यासाठी पासपोर्ट आवश्यक असतो. शक्तिशाली पासपोर्ट त्या देशातील नागरिकांना व्हिसाशिवाय विविध देशांमध्ये जाण्यास मदत करतो. अशा परिस्थितीत, हेन्ली पासपोर्ट इंडेक्स देशांच्या पासपोर्टला त्यांच्या ताकदीच्या आधारावर क्रमवारीत स्थान देतो. नुकताच हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2024 जाहीर झाला आहे. चला तर मग या यादीत कोणता देश कोणत्या क्रमांकावर आहे आणि विशेष म्हणजे भारत कोणत्या क्रमांकावर आहे ते जाणून घेऊया...

या यादीत फ्रान्ससह अनेक देश आघाडीवर आहेत

दरम्यान, या यादीत फ्रान्सचा पासपोर्ट अव्वल स्थानी आहे. आता फ्रेंच नागरिक व्हिसाशिवाय 194 देशांमध्ये जाऊ शकतात. मात्र केवळ फ्रान्सच नाही तर जपान, जर्मनी, इटली, स्पेन आणि सिंगापूरही आघाडीवर आहेत.

Indian Passport
India-Iran Free Visa Travel: आनंदाची बातमी! आता इराणनं भारतीयांना दिलं मोठं गिफ्ट; पर्यटनाला चालना देण्यासाठी...

भारतीय पासपोर्ट किती मजबूत आहे?

जिथे 2023 मध्ये भारतीय पासपोर्ट 84 व्या क्रमांकावर होता, तो आता 2024 मध्ये 85 व्या स्थानी पोहोचला आहे. जिथे भारतीय नागरिक व्हिसाशिवाय फक्त 60 देशांमध्ये जाऊ शकत होते, तिथे आता ते 62 देशांमध्ये जाऊ शकतात.

Indian Passport
VISA Free Entry: चला जग फिरुया! श्रीलंका-थायलंडनंतर 'या' सुंदर देशातही भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश

शेजारील देशांची परिस्थिती कशी आहे?

दुसरीकडे, शेजारी देश पाकिस्तानची जैस थे स्थिती आहे. पाकिस्तान या क्रमवारीत 106 व्या क्रमांकावर आहे, तथापि, बांगलादेश 101 वरुन 102 वर घसरला आहे. मालदीवबद्दल बोलायचे झाल्यास, त्याचा पासपोर्ट 58 व्या क्रमांकावर आहे ज्यामुळे मालदीवचे नागरिक व्हिसाशिवाय एकूण 96 देशांना भेट देऊ शकतात. चीनच्या पासपोर्टने क्रमवारीत चांगली झेप घेतली आहे. जिथे गेल्या वर्षी ते 66 व्या क्रमांकावर होते, आता ते 64 व्या क्रमांकावर आले आहे.

ही क्रमवारी कशी तयार केली जाते?

हेन्ली पासपोर्ट इंडेक्स हा IATA म्हणजेच आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने 199 वेगवेगळ्या देशांच्या पासपोर्ट आणि जगभरातील सुमारे 227 प्रवास स्थळांवर दिलेल्या गेल्या 19 वर्षांच्या डेटावर आधारित आहे. येथील निर्देशांक दर महिन्याला अपडेट केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com