India-Iran Free Visa Travel: आनंदाची बातमी! आता इराणनं भारतीयांना दिलं मोठं गिफ्ट; पर्यटनाला चालना देण्यासाठी...

India-Iran Free Visa Travel: भारतीय पासपोर्टची ताकद सातत्याने वाढत असून ही भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे.
Iranian President and Prime Minister Modi
Iranian President and Prime Minister ModiDainik Gomantak
Published on
Updated on

India-Iran Free Visa Travel: भारतीय पासपोर्टची ताकद सातत्याने वाढत असून ही भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे. आता भारतीय केवळ पासपोर्टद्वारे आणखी एका देशात जाऊ शकणार आहेत. यासाठी त्यांना व्हिसाची गरज भासणार नाही. इराण सरकारने भारताला ही भेट दिली आहे. इराणचा उद्देश आपल्या देशातील पर्यटनाला चालना देणे आणि जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणे हा आहे. इराणने भारतासह 33 देशांसाठी व्हिसाची अट रद्द केली आहे. आता या देशांतील लोक व्हिसाशिवाय इराणमध्ये जाऊ शकणार आहेत. भारतीयांना इराणचा सांस्कृतिक वारसा आणि पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. याबाबत इराणचे सांस्कृतिक वारसा मंत्री एझातोल्लाह जरघामी म्हणाले की, जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

या देशांना मोफत व्हिसा प्रवेशही मिळाला

दरम्यान, इराणने भारतासह अनेक देशांतील पर्यटकांसाठी व्हिसाची अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्युनिशिया, लेबनॉन, सौदी अरेबिया, अनेक मध्य आशियाई, आफ्रिकन आणि मुस्लिम देशांसह सुमारे 33 देशांना प्रवासासाठी मोफत व्हिसा देण्यात आला आहे. तसेच, नाटो आणि युरोपियन युनियनचे सदस्य असलेल्या पाश्चात्य मित्र युरोपीय राष्ट्र क्रोएशियाच्या लोकांनाही ही भेट मिळाली आहे.

Iranian President and Prime Minister Modi
India-Iran Relations: 3 वर्षे इराणच्या कैदेत असलेले नाविक आज परतणार भारतात; पीएम मोदींना मागितली होती मदत

थायलंडनेही भारतीयांसाठी मोफत व्हिसा जाहीर केला

याआधी, थायलंडनेही भारतासाठी मोफत व्हिसाची घोषणा केली होती. थायलंडच्या PM Sretha Thavisin यांनी सांगितले होते की, 1 नोव्हेंबरपासून भारतीय लोक व्हिसाशिवाय थायलंडला येऊ शकतील. भारताबरोबरच थायलंडनेही तैवानला मोफत व्हिसा प्रवेश सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com