भारतीय सैनिक शिकणार ड्रॅगनची भाषा; जाणून घ्या त्यामागचं कारण

भारतीय लष्कर 'मंदारिन' ही चिनी भाषा शिकण्यावर सध्या भर देत आहे.
Indian Army
Indian ArmyDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय लष्कर (Indian Army) मंदारिन ही चिनी भाषा शिकण्यावर सध्या भर देत आहे. याशिवाय, सैनिकांना चीनबद्दल माहिती दिली जाईल जेणेकरून त्यांना त्याच्या कामाच्या पद्धती आणि रणनीती जाणून घेण्यास मदत होईल. हायब्रीड वॉरफेअरच्या युगात माहितीकडे महत्त्वाचे शस्त्र म्हणून पाहिले जात असल्याने भारतीय लष्कर या आघाडीवर लक्ष केंद्रित करताना दिसत आहेत. लष्करांच्या या प्रयत्नाला लडाखमधील चीनच्या आक्रमकतेशी जोडले गेले आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली होती, ज्यामध्ये 20 जवान शहीद झाले. याशिवाय चिनी सैनिकही मोठ्या प्रमाणात मारले गेले आहेत. (The Indian Army is learning Mandarin Chinese)

Indian Army
...म्हणून प्रवासी महिलेला ठोठावला 62 लाखांचा दंड

नुकतेच लष्करप्रमुख एमएम नरवणे यांना एक प्रेझेंटेशन देण्यात आले, ज्यामध्ये मंदारिन शिकण्या बद्दल सांगण्यात आले. याअंतर्गत सैनिकांना मंदारिनचे प्रशिक्षण दिले जाईल. याशिवाय विद्यापीठे आणि इतर संस्थांमध्ये मंदारिन भाषा देखील शिकवली जाणार जेणेकरून चीनची भाषा समजणारे लोक तयार करता येतील. आतापर्यंत, पूर्व लडाखमधील सैन्याची तैनाती कमी करण्याचे कोणतेही संकेत चीनकडून मिळाले नाहीत. या मुद्द्यावर नुकतेच भारत दौऱ्यावर आलेले चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनाही कडक संदेश देण्यात आले आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जोपर्यंत सैन्याची तैनाती आणि सीमेवरील तणाव कमी होत नाही तोपर्यंत दोन्ही देशांमधील संबंध सामान्य होऊ शकणार नाहीत, असे ही जयशंकर म्हणाले होते.

दरम्यान, 18 ते 22 एप्रिल दरम्यान आर्मी कमांडर्सची परिषद भरणार आहे. यादरम्यान लष्करप्रमुख ऑपरेशन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. याशिवाय, 3,488 किमी लांबीच्या LAC सीमेवर पायाभूत सुविधांच्या विकासाविषयी देखील माहिती मिळणार आहे. युक्रेन (Russia) आणि रशिया (Ukraine) यांच्यातील युद्धातून मिळालेल्या धड्यांवरही या परिषदेत चर्चा होणार असल्याचे म्हटले जात आहे. यादरम्यान रशिया आणि युक्रेनसारखी युद्धाची परिस्थिती उद्भवल्यास भारताने कोणती पावले उचलायची याचा आराखडा तयार केला जाणार आहे. मुख्य म्हणजे सैनिकांना चीनची भाषा समजावी आणि त्याबाबत जास्तीत जास्त माहिती मिळावी, अशी लष्कराच्या नेतृत्वाची संकल्पना आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की गेल्या वर्षीच लष्कराने आपल्या काही सैनिकांसाठी तिबेटोलॉजीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आल होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com