...म्हणून प्रवासी महिलेला ठोठावला 62 लाखांचा दंड

प्रवासी महिलेने केबिन क्रू मेंबर्सना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
Aeroplane
Aeroplane Dainik Gomantak
Published on
Updated on

प्रवासादरम्यान विमानातील कर्मचाऱ्यांवर हल्ला करून विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्यामुळे एअरलाईन कंपनीने महिला प्रवाशाला 62 लाख रुपये दंड ठोठावला आहे. (women fined for misbehaving in plane)

Aeroplane
श्रीलंकेत राष्ट्रपती भवनासमोर लोकांनी लावले तंबू, कोलंबोत 'गो होम गोटा'चा आक्रोश

ही घटना अमेरिकन एअरलाइन्स फ्लाइट 1774 मध्ये घडली. प्रवासादरम्यान, प्रवासी (Passenger) महिलेने केबिन क्रू मेंबर्सना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पुढे विमानाचा दरवाजा उघडण्याचाही आरोप तिच्यावर आहे. महिलेचे हे कृत्य पाहून तिला सीटला बांधून ठेवण्यात आले. काही सहप्रवाशांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला, त्यानंतर महिलेची चौकशी सुरू झाली. तपासानंतर आता एअरलाइन कंपनीने आरोपी महिलेवर कारवाई केली आहे. तिला $81,950 (62 लाखांपेक्षा जास्त) दंड ठोठावण्यात आला आहे.

Aeroplane
दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन शहरात महापुर, 340 हून अधिक लोकांचा मृत्यू

nypost.com च्या रिपोर्टनुसार, फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने लावलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दंड आहे. महिलेच्या या कृत्यामुळे विमानाला सुमारे 3 तास उशीर झाल्याचे सांगण्यात आले.

या घटनेबाबत दुसऱ्या एका प्रवाशाने त्याच्या टिकटॉक अकाऊंटवर सांगितले की, ती महिला (Woman) ओरडत होती. मला विमानातून उतरावे लागेल असे ती सांगत होती. ती दार उघडण्याचा प्रयत्नही करत होती. प्रवाशाने महिलेचा एक फोटो देखील शेअर केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com