भारतीय वंशाच्या राजा कृष्णमूर्तींचा अमेरिकेत डंका, मिळाला हा विशेष सन्मान

इलिनॉयचे मंत्री जेसी व्हाईट यांच्या हस्ते खासदार राजा कृष्णमूर्ती (Raja Krishnamoorthi) यांना हा सन्मान देण्यात आला.
Raja Krishnamoorthi
Raja KrishnamoorthiDainik Gomantak

Raja Krishnamoorthi: भारतीय-अमेरिकन खासदार राजा कृष्णमूर्ती यांना त्यांच्या उत्कृष्ट कारकिर्दीबद्दल आणि सार्वजनिक सेवेतील समर्पणाबद्दल 'विशेष नेतृत्व' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इलिनॉयचे मंत्री जेसी व्हाईट यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान देण्यात आला. (Indian American mp krishnamoorthi received a special award honoured for special services)

इलिनॉय मंत्री सन्मानित

इलिनॉयचे मंत्री जेसी व्हाईट यांनी 48 वर्षीय लोकशाहीवादी नेते कृष्णमूर्ती यांना हा पुरस्कार प्रदान केला. राजा कृष्णमूर्ती (Raja Krishnamoorthi) हे 2017 पासून इलिनॉयमधून यूएस प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत.

Raja Krishnamoorthi
Canada Bans Handguns: '...पंतप्रधान जस्टिन ट्रूडो अ‍ॅक्शन मोडमध्ये'

चमकदार कारकिर्दीसाठी पुरस्कार मिळाला

गेल्या आठवड्यात कृष्णमूर्ती यांना हा पुरस्कार प्रदान करताना व्हाईट म्हणाले, "तुमच्या उत्कृष्ट कारकीर्दीचा आणि सार्वजनिक सेवेतील तुमच्या समर्पणाचा गौरव करताना मला अभिमान वाटतो. तुमच्या सारख्या अद्वितीय व्यक्तिमत्वाला मी हा सन्मान देत आहे ही आनंदाची बाब आहे.''

पुरस्कार जिंकल्याबद्दल अभिनंदन

"मला आशा आहे की या प्रांतासाठी आणि आमच्या देशासाठी तुम्ही केलेल्या असाधारण सेवेबद्दल आमच्या कृतज्ञतेची आठवण करुन देत राहील," असेही ते म्हणाले. 'विशेष नेतृत्व पुरस्कार' जिंकल्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन.

Raja Krishnamoorthi
Canada Election Results: जस्टिन ट्रुडो पंतप्रधान म्हणून विजयी मात्र बहुमतापासून दूरच

दिल्लीतील तमिळ कुटुंबात जन्म

कृष्णमूर्ती म्हणाले की, 'व्हाईटसारख्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्तीकडून नेतृत्वाचा पुरस्कार मिळणे खरोखरच सन्मानाची गोष्ट आहे.' कृष्णमूर्ती यांचा जन्म दिल्लीमध्ये (Delhi) एका तामिळ कुटुंबात झाला, मी तीन महिन्यांचा असताना माझे कुटुंब अमेरिकेत (America) आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com