8 Navy Veterans Death Row: कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावलेल्या नौदल अधिकाऱ्यांना भेटले भारतीय राजदूत; सांगितला पुढचा प्लॅन

8 Navy Veterans Death Row: कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या भारतीय नौदलातील आठ माजी अधिकाऱ्यांना जीवदान मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहे.
External Affairs Ministry Spokesperson Arindam Bagchi
External Affairs Ministry Spokesperson Arindam BagchiDainik Gomantak

8 Navy Veterans Death Row: कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या भारतीय नौदलातील आठ माजी अधिकाऱ्यांना जीवदान मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. गुरुवारी, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, सरकार या प्रकरणावर लक्ष ठेवून असून त्यांना सर्व कायदेशीर सहाय्य प्रदान करत आहे. 3 डिसेंबर रोजी त्यांनी सर्व पीडितांची भेट घेतली. या प्रकरणी दोन वेळा सुनावणी झाली असून फाशीच्या शिक्षेविरुद्ध अपील दाखल करण्यात आले आहे, असेही बागची म्हणाले.

26 ऑक्टोबर 2023 रोजी हेरगिरीसाठी शिक्षा सुनावण्यात आली

दरम्यान, 26 ऑक्टोबर 2023 रोजी हेरगिरीप्रकरणी कतारमध्ये 8 भारतीय माजी नौसैनिक कॅप्टन नवतेज सिंग गिल, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर अमित नागपाल, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कमांडर सुगुणाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता आणि रागेश नावाच्या आणखी एकाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. वृत्तानुसार, नौदलातून निवृत्त झाल्यानंतर हे सर्वजण दोहास्थित कंपनी अल दाहरामध्ये काम करत होते. 2022 मध्ये, खमिस अल आझमी (ओमान वायुसेनेचे सेवानिवृत्त प्रमुख) यांच्यासोबत हे सर्वजण कंपनी चालवत होते. या सर्वांना काही गंभीर आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांची जामिनावर तुरुंगातून सुटका झाली होती, परंतु नंतर 29 मार्च 2023 रोजी त्यांच्याविरुद्ध खटला सुरु झाला. आता 26 ऑक्टोबर 2023 रोजी या सर्वांना न्यायालयाने हेरगिरीसाठी फाशीची शिक्षा सुनावली. दुसरीकडे, भारत सरकारने या निर्णयावर आक्षेप घेतला आणि सर्व कायदेशीर सहाय्य उपलब्ध करुन देण्याबाबत सांगितले.

External Affairs Ministry Spokesperson Arindam Bagchi
Qatar Navy Veterans Case: 8 भारतीयांच्या फाशीच्या शिक्षेमागे पाकिस्तानचा हात? पाक-कतारी अधिकाऱ्यांच्या भेटी...

सध्या या प्रकरणात रोज एक नवा आशेचा किरण दिसत आहे. याबाबत बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी पीडित माजी नौसैनिकांसोबत झालेल्या भेटीची माहिती देताना सांगितले की, या अधिकाऱ्यांना वाचवण्यााठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे, सरकार याप्रकरणावर लक्ष ठेवून आहे. या शिक्षेविरोधात अपील दाखल झाल्यानंतर आतापर्यंत या प्रकरणात दोन सुनावणी झाल्या आहेत.

External Affairs Ministry Spokesperson Arindam Bagchi
Qatar: हेरगिरी प्रकरणात भारतीय नौदलाच्या 8 अधिकाऱ्यांना होणार फाशीची शिक्षा? PAK मीडियाचा खळबळजनक दावा

COP28 मध्ये पीएम मोदींनी द्विपक्षीय चर्चाही केली

बागची यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, 'कैद्यांचे अंतिम अपील होते. आम्ही कुटुंबियांच्या वतीने अपील दाखल केले आणि तेव्हापासून 2 सुनावणी झाल्या. आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत आणि सर्व कायदेशीर आणि वाणिज्य सहाय्य प्रदान करत आहोत. दरम्यान, आमच्या राजदूताला 3 डिसेंबर रोजी तुरुंगात असलेल्या सर्व 8 जणांना भेटण्यासाठी कॉन्सुलर ऍक्सेस मिळाला. COP28 च्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुबईत कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय संबंधांवर सकारात्मक चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालय या प्रकरणाला अधिक महत्त्व देत असून सर्व कायदेशीर पर्यायांचा धांडोळा घेत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com