China: ड्रॅगनचा नेपाळला विळखा, सीमेवर वसवले गाव; भारताला दिला इशारा

China News: चीन विस्तारवादी नितीला अधिक बळ देत चालला आहे.
Village
VillageDainik Gomantak

China's Expansionist Policies: चीन विस्तारवादी नितीला अधिक बळ देत चालला आहे. डोकलाममध्ये चीनने एक गाव वसवले असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, भारताने चीनला याबाबत कडक इशारा दिला आहे. भारतासोबत चीनची 3488 किमी लांबीची सीमा आहे. मात्र सीमारेषेवरील (LAC) भागांवर कब्जा करण्यास चीनने सुरुवात केली आहे. त्याचबरोबर भूतानसोबतच्या 477 किलोमीटरच्या सीमेवरही चीनचा डोळा आहे.

दरम्यान, चीनी घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, जिनपिंग सरकार सीमेवर मॉडेल गाव तयार करत आहे. त्याशिवाय, LAC आणि भूतानजवळील वादग्रस्त भागावर कब्जा करण्याची योजनही चीन आखत आहे. वादग्रस्त सीमेवर चीन (China) पूर्व सैनिकांना तैनात करत आहे. चिनी राजवटीला मजबूत करण्यासाठी जिनपिंग यांच्या धोरणाचा हा एक भाग आहे.

Village
China: शी जिनपिंगच्या दडपशाहीला कंटाळून चिनी नागरिक सोडताहेत देश

दुसरीकडे, MAXAR ने कॅप्चर केलेले फोटो मंगळवारी प्रसारमाध्यमांना प्रसिद्ध केले. अमू चू जवळ असलेल्या चिनी युटोपियन गावात कार आणि बागा दिसल्या. याद्वारे चीन स्वायत्त प्रदेशातील तिबेटीयन बौद्ध धर्मीय अनुयायांची फुटीरतावादाची मागणी संपवू इच्छित आहे. यासोबतच सुन्नीबहुल शिनजियांग प्रांतातही असचं काहीसं करण्याचा चीनचा प्लॅन आहे.

Village
China: राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी जिनपिंग यांच्याविरोधात मोहीम सुरु

शिवाय, डोकलाम भागात भारत (India) आणि चीनमध्ये 73 दिवसांचा संघर्ष सुरु होता. चीन या भागात विस्तारवादी निती अंतर्गत पायाभूत सुविधांचा विकास करत आहे. दुसरीकडे, भारत आणि चीन यांच्यातील सीमा विवाद चर्चेद्वारे सोडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 17 जुलै रोजी झालेल्या शेवटच्या वरिष्ठ लष्करी कमांडर्सच्या बैठकीत, दोन्ही बाजूंनी एप्रिल 2020 पर्यंतची स्थिती पूर्ववत ठेवण्याबद्दल चर्चा झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com