उत्तर कोरियात आतड्याचा नवा आजार; 800 कुटुंबांना झाली लागण

''कॉलरा किंवा टायफॉइड असल्याचा स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांचा अंदाज''
North Korea New Disease
North Korea New DiseaseDainikGomantak
Published on
Updated on

संपुर्ण जग कोरोना महामारीविरोधात दोन हात करत असाना उत्तर कोरिया हा पूर्व आशियात असणाऱ्या देशासमोर मात्र वेगळेच संकट उभे आहे. या देशात आतड्याचा नवा आजार पसरत असून, कोरियातील सुमारे 800 कुटुंबांना या रोगाची लागण झाली आहे. बाधित कुटुबांना आतापर्यंत दक्षिण ह्वांघाई प्रांतात उपचारासाठी स्थलांतरीत केले आहे. तसेच या रोगाला उत्तर कोरियाने ‘अ‍ॅक्युट आंत्रिक महामारी’ असे नाव देण्यात आले असल्याची ही माहिती समोर आली आहे. (North Korea 800 families suffer from mystery intestinal illness )

एका आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, दक्षिण कोरियाचे अधिकारी म्हणतात की हा कॉलरा किंवा टायफॉइड असू शकतो. याबाबत नवीन मोठ्या प्रमाणातील रुग्णांची नोंद ही प्रथम गुरुवारी झाली आहे. यापार्श्वभूमीवर सर्व रहिवाशांसाठी सखोल तपासणीसह तपशीलवार प्रतिबंधात्मक प्रयत्न सुरु आहेत. तेसच विशेष उपचार लहान मुले आणि वृद्धांसारख्या समाजातील विशेष घटकावर देखरेख आणि उपचार सुरु आहेत. या रोगाला नियंत्रित करण्यासाठी राष्ट्रीय "रॅपिड डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट टीम" स्थानिक आरोग्य अधिकार्‍यांसह काम करत आहे, असे KCNA वृत्तसंस्थेने सांगितले.

यासोबतच, पिण्याच्या आणि घरगुती पाण्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सांडपाणी आणि इतर कचऱ्यासह निर्जंतुकीकरणाचे काम केले जात असल्याचे अहवालात नमूद केले आहे. जिथे एकीकडे उत्तर कोरिया आधीच कोरोना महामारीशी झुंज देत आहे. त्याचवेळी आतड्यांसंबंधीच्या नव्या आजाराने उत्तर कोरियाच्या समस्यांमध्ये भर घातली आहे. या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी वैद्यकीय दल तैनात केले असून याबाबत काय करता येईल यावर गांभिर्याने विचार सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com