India Pakistan War: भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान बेजार! कर्जासाठी भटकंती सुरू, मित्र राष्ट्रांकडे मागितली मदत

India Attacks Pakistan: भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती आता खूपच तणावपूर्ण बनली आहे. गुरुवारी रात्री पाकिस्तानने भारतातील अनेक भागात हल्ला करण्याचा प्रयत्न केला, जो भारतीय सैन्याने हाणून पाडला.
India Pakistan War
India Pakistan WarDainik Gomantak
Published on
Updated on

भारताने पाकिस्तानला सर्व बाजूंनी घेरण्याची रणनिती आखली आहे. पाकिस्तानने काल जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरात सीमेवरुन भारतावर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पाकिस्तानचा हा हवाई हल्ला भारतीय लष्करानं यशस्वीरित्या परतवून लावला. पाकिस्तानच्या या नापाक कृतीला भारताकडून जशास तसं चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

पाकिस्तानच्या प्रत्येक कृतीला भारत योग्य उत्तर देत आहे. दरम्यान, पाकिस्तानची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. अलिकडेच पाकिस्तान सरकारने संपूर्ण जगासमोर विनवणी केली आहे. पाकिस्तान सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागानुसार, भारतीय हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत, आता पाकिस्तान सरकारने जगभरातील त्यांच्या आंतरराष्ट्रीय भागीदारांकडून अधिक कर्जाची मागणी केली आहे.

India Pakistan War
India Pakistan WarDainik Gomantak
India Pakistan War
Pakistan Attacks India: पाकड्यांचा भ्याड हल्ला, भारतीय सैन्याचे चोख प्रत्युत्तर; 'ती' 15 ठिकाणे कोणती?

भारताकडून मिळालेल्या प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानची अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती अधिकच बिघडली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानने आता थेट जगभरातील आंतरराष्ट्रीय संस्थांकडे मदतीची याचना सुरू केली आहे.

पाकिस्तान सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाची एक पोस्ट समोर आली आहे. "शत्रूकडून झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर पाकिस्तान सरकारने आंतरराष्ट्रीय भागीदारांना अधिक कर्जासाठी आवाहन केले आहे.

वाढत्या युद्ध आणि घसरत्या साठ्यादरम्यान, आम्ही आंतरराष्ट्रीय भागीदारांना तणाव कमी करण्यास मदत करण्याचे आवाहन करतो. राष्ट्राला खंबीर राहण्याचे आवाहन केले जाते," असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील एका पोस्टमध्ये वाचले आहे. पाकिस्तानने या पोस्टमध्ये जागतिक बँकेलाही टॅग केलं आहे.

India Pakistan War
India Pakistan War: पाकिस्तानच्या ड्रोन, क्षेपणास्त्रांचा खात्मा! भारताकडून इस्लामाबाद, लाहोर, बहावलपूर येथे हल्ले

भारताने पाकिस्तानचे ५० हून अधिक ड्रोन, ४ लढाऊ विमाने आणि ८ क्षेपणास्त्रे नष्ट केली आहेत. भारताने पाकिस्तानची इव्होकेटिव्ह सिस्टीमही नष्ट केली आहे. भारताच्या या प्रतिहल्ल्याने पाकिस्तान गोंधळलेला आहे.

पाकिस्तानने मित्र देशांकडूनही मदत मागण्यास सुरुवात केली आहे. भारतासोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने आता आपल्या मित्र देशांना अधिक कर्ज देण्यास सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com