Pakistan Attacks India: पाकड्यांचा भ्याड हल्ला, भारतीय सैन्याचे चोख प्रत्युत्तर; 'ती' 15 ठिकाणे कोणती?

Manish Jadhav

ऑपरेशन सिंदूरनंतर हल्ला

7 आणि 8 मे च्या रात्री पाकिस्तानने उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. हे हल्ले भारताच्या कारवाईनंतर झाले.

Pakistan Attacks India | Dainik Gomantak

पाकिस्तानने लक्ष्य केलेली ठिकाणे

पाकिस्तानने अवंतिपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भूज या ठिकाणांना लक्ष्य केले.

Pakistan Attacks India | Dainik Gomantak

सुरक्षा यंत्रणेची तत्परता

भारताच्या इंटिग्रेटेड काउंटर UAS ग्रिड आणि एअर डिफेन्स सिस्टिमने सर्व क्षेपणास्त्र आणि ड्रोन निष्प्रभ केले. कोणतीही गंभीर हानी झाली नाही.

Pakistan Attacks India | Dainik Gomantak

हल्ल्यांचे ठोस पुरावे

पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांचे अवशेष विविध ठिकाणी सापडले आहेत. यावरुन पाकिस्तानकडून झालेला हेतुपुरस्सर हल्ला सिद्ध होतो.

Pakistan Attacks India | Dainik Gomantak

करारी प्रत्युत्तर

भारताने पाकिस्तानमधील अनेक एअर डिफेन्स रडार्स आणि सिस्टम्सवर हल्ला केला. लाहोर येथील एक एअर डिफेन्स युनिट निष्क्रिय करण्यात आले.

Pakistan Attacks India | Dainik Gomantak

सीमारेषेवर गोळीबार

पाकिस्तानकडून कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पूंछ, मेंधर व राजौरी येथे अकारण गोळीबार सुरु असून मोर्टार आणि तोफांचा वापर होत आहे.

Pakistan Attacks India | Dainik Gomantak

भारताची भूमिका

भारतीय लष्कर शांततेचा मार्ग स्वीकारत असले तरी, कोणताही हल्ला झाला तर त्याला योग्य आणि तीव्र प्रत्युत्तर देण्यास भारत सक्षम आहे.

Pakistan Attacks India | Dainik Gomantak
आणखी बघा