India South Africa Direct Flights: भारतातून दक्षिण आफ्रिकेला थेट विमानसेवा; 6 महिन्यांत सुरू करण्यासाठी प्रयत्न

Direct Flights to South Africa: भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे सांस्कृतिक, राजकीय ऋणानुबंध अतिशय सुदृढ आहेत.
Direct Flights to South Africa
India South Africa Direct FlightsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे सांस्कृतिक, राजकीय ऋणानुबंध अतिशय सुदृढ आहेत. ते अधिक सक्षम करण्याच्या अनुषंगाने उद्योग आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत ते दक्षिण आफ्रिका थेट विमानसेवा येत्या सहा महिन्यांत सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे दक्षिण आफ्रिकेचे वाणिज्य महादूत गडिअन लबाने यांनी सांगितले. व्हायब्रंट गोवा संमेलनात ते सहभागी झाले असता ‘गोमन्तक टीव्ही’साठी आयटी व्यावसायिक प्रज्योत माईणकर यांनी घेतलेल्या मुलाखतीवेळी ते बोलत होते.

भारतीयांचे स्वागत

दक्षिण आफ्रिकेत ज्यासाठी एक महत्त्वाची अडचण येते, ती व्हिसाची. आमच्याकडे ही प्रक्रिया आता ई-व्हिसा अंतर्गत केली असून पूर्वी व्हिसा मिळण्यासाठी सात दिवस लागायचे; परंतु आता ४८ तासांत व्हिसा मिळतो. देशात येणाऱ्या पर्यटन आणि विदेशी नागरिकांच्या सुरक्षेवर प्राधान्य देण्यात येत असून दक्षिण आफ्रिकेत येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक भारतीयाचे स्वागत असल्याचे लबाने यांनी सांगितले.

Direct Flights to South Africa
Goa Azulejos Art: भिंतींवर रंगलेला गोव्याचा इतिहास! अझुलेजोस कलेची अनोखी परंपरा

आफ्रिकेत उद्योगांच्या संधी : भारतीय उद्योजक दक्षिण आफ्रिकेत अतिशय उत्कृष्ट व्यवसाय करत आहेत. भारतातील १५० हून अधिक प्रमुख कंपन्या येथे कार्यरत असून दक्षिण आफ्रिकेच्या उद्योग जगतात त्यांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. येथे उद्योगाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, असे वाणिज्य महादूत लबाने यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.