UN General Assembly: 'दिवसा सुरक्षेची भाषा, रात्री आतंकवाद...!', संयुक्त राष्ट्रात भारताचा पाकड्यांना दणका; अल्पसंख्याकांवरील अत्याचारावरुनही सुनावले खडे बोल

India Slams Pakistan UN General Assembly: संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या अधिवेशनात भारताने पाकिस्तानचे पितळ उघडे पाडत दहशतवाद आणि त्यांच्या खोट्या प्रचारावर जोरदार प्रहार केला.
India Slams Pakistan UN General Assembly
India Slams Pakistan UN General AssemblyDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

India Slams Pakistan UN General Assembly: संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या अधिवेशनात भारताने पाकिस्तानचे पितळ उघडे पाडत दहशतवाद आणि त्यांच्या खोट्या प्रचारावर जोरदार प्रहार केला. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आपल्या भाषणात भारत-पाक संबंध, ऑपरेशन सिंदूर आणि सिंधू पाणी करारावर भाष्य करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्तक्षेपाचे कौतुक केले. तसेच पाण्यावरुन भारताला दम भरण्याचा प्रयत्न केला. यावर संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या स्थायी मिशनच्या फर्स्ट सेक्रेटरी पेटल गहलोत यांनी पाकिस्तानला सडेतोड आणि रोखठोक उत्तर देत त्यांच्या दुतोंडी चेहऱ्याचा पर्दाफाश केला.

गहलोत यांनी पाकिस्तानवर (Pakistan) घणाघात करताना म्हटले की, पाकिस्तानचे वागणे पूर्णपणे विसंगत आहे; ते दिवसा सुरक्षेची भाषा करतात आणि रात्रीच्या अंधारात दहशतवादाला प्रोत्साहन देतात. शाहबाज शरीफ सरकार हे प्रत्यक्षात तिथल्या लष्कराच्या आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्या हातातली केवळ एक कठपुतळी सरकार आहे.

India Slams Pakistan UN General Assembly
Pakistan Airstrikes Afghanistan: पाकड्यांचा अफगाणिस्तानवर पुन्हा मोठा हवाई हल्ला! बॉम्बस्फोटांनी हादरलं कंदहार; ड्यूरंड लाईनवर दाटले युद्धाचे ढग VIDEO

9/11च्या महाभयंकर दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि गुन्हेगार ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानातच लपून बसला होता आणि तो थेट पाकिस्तानी लष्करी अकादमीच्या जवळच राहत होता. पाकिस्तानने केवळ त्याला आश्रय आणि संरक्षणच दिले नाही, तर त्याला मदतही केली. एका दहशतवाद्याला पोसणाऱ्या देशाचा याहून मोठा पुरावा तो काय असू शकतो?

India Slams Pakistan UN General Assembly
Pakistan Bomb Blast: पाकिस्तान हादरलं! खैबर पख्तूनख्वामध्ये नमाजादरम्यान रक्ताचा सडा; भीषण आत्मघाती हल्ल्यात 16 ठार, 50 हून अधिक जखमी

महासभेत बोलताना पेटल गहलोत यांनी स्पष्ट केले की, जगाने नुकतीच 9/11च्या हल्ल्याची 25 वी वर्षपूर्ती पाळली, अशावेळी पाकिस्तान स्वतःला त्रस्त आणि पीडित देश म्हणून भासवण्याचा प्रयत्न करत आहे, जे अत्यंत हास्यास्पद आणि पूर्णपणे खोटे आहे. जगजाहीर आहे की, ओसामा बिन लादेन पाकिस्तानात लपला होता आणि अमेरिकन सैन्याने तिथे घुसून त्याचा खात्मा केला. परंतु, आज पाकिस्तानातील जनताच फेब्रुवारी 2024च्या निवडणुकीत मोठा फेरफार झाल्यामुळे शाहबाज शरीफ यांच्या सरकारला 'फॉर्म 47 सरकार' म्हणून हिणवत आहे.

India Slams Pakistan UN General Assembly
Attack on Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करावर दोन ठिकाणी हल्ले; 25 जवान ठार, 3 वाहने उद्ध्वस्त; BLAनं VIDEO केला शेअर

धार्मिक अल्पसंख्याकांच्या अधिकारांवर बोलताना पेटल गहलोत यांनी पाकिस्तानला आरसा दाखवला. ज्या देशात 'ईशनिंदा कायद्या'सारखे क्रूर नियम चालतात आणि अल्पसंख्याकांवर अमानुष अत्याचार केले जातात, तो देश मानवाधिकार आणि सहिष्णुतेचा धडा शिकवत आहे. पाकिस्तानात हिंदू, शिख आणि ख्रिश्चन समुदायांची काय दशा आहे, हे अवघ्या जगाला माहिती आहे. शेवटी भारताने पुन्हा एकदा ठणकावून सांगितले की, जम्मू-काश्मीर हा भारताचा अभिन्न आणि अविभाज्य भाग आहे आणि नेहमी राहील. पाकिस्तानने स्वतःच्या देशातील खालावलेली कायदा व सुव्यवस्था पाहावी आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांवर होत असलेल्या अत्याचारांचे उत्तर द्यावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com