OIC:पाकयुक्त काश्मीरमध्ये ओआयसी( OIC) अर्थात ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉरपोरेशनच्या महासचिवांनी दौरा केला आहे .ओआयसीचे महासचिव जनरल एच ब्राहिम ताहा यांनी पाकव्याप्त काश्मीरविषयी आपले मत व्यक्त केले होते.
मात्र,आता या दौऱ्यावर भारताने आक्षेप घेतला आहे. पाकव्याप्त काश्मिर आणि ओआयसीचा कोणताही संबंध नाही.तसेच भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये लक्ष घालण्याचा प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. ओआयसी आणि त्यांच्या महासचिवांचा भारतामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रकार पूर्णपणे अस्विकार्य आहे असे भारातचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे. याआधीच पक्षपाती ,सांप्रदायिक आणि चूकीची तत्वे धारण केल्यामुळे ओआयसी आपली विश्वासार्हाता घालवून बसला आहे. ओआयसीच्या महासचिवांनी पाकिस्तानची भाषा बोलणे अत्यंत दुर्दैवी आहे .
भारत आणि जम्मु ( Jammu )काश्मीरमध्ये आतंकवाद (Terrorism )पसरवण्याच्या पाकिस्तानच्या अजेंड्यापासून ते दूर राहतील अशी आम्ही आशा करतो. सीमापार दहशतवादाला त्यांनी खतपाणी घालू नये असेही बागची यांनी म्हटले आहे.ओआयसी 57 देशांची अशी संघटना आहे, ज्यामध्ये अधिकतर मुस्लीम देशांचा समावेश आहे. भारताला नेहमीच दहशतवादाचा सामना करावा लागतो. त्यामुळे भारत नेहमीच दहशतवादाविरोधी भूमिका घेत असतो.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.