भारताने अफगाणिस्तानमधील राजनैतिक उपस्थिती कायम ठेवावी; तालिबान केली विनंती

भारताने (India) काबूलमधून आपले राजनयिक अधिकारी परत आणण्याची योजना आखली आहे.
Mohammed Abbas Stanikzai
Mohammed Abbas StanikzaiDainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान्यांनी (Taliban) सत्ता ताब्यात घेतल्यानंतर जगभरातील देशांनी विशेष:त अमेरिका, ब्रिटन, भारत यांनी आपल्या राजनयिक अधिकाऱ्यांबरोबर नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. यातच आता या आठवड्याच्या सुरुवातीला हे स्पष्ट करण्यात आले आहे की, भारताने (India) काबूलमधून आपले राजनयिक अधिकारी परत आणण्याची योजना आखली आहे. दुसरीकडे, वरिष्ठ तालिबान नेते शेर मोहम्मद अब्बास स्तिनकझाई (Mohammed Abbas Stanikzai) यांनी भारत सरकारला विनंती केली आहे. ज्यामध्ये भारतीय राजनयिक अधिकाऱ्यांची उपस्थिती कायम ठेवण्यास सांगण्यात आले आहे. तालिबान नेत्याद्वारे करण्यात आलेली ही विनंती अनौपचारिक होती. भारताने सोमवार आणि मंगळवारी दोन लष्करी उड्डाणांद्वारे अफगाणिस्तानातून सुमारे 200 लोकांना बाहेर काढले.

Mohammed Abbas Stanikzai
तालिबान ने ‘इस्लामिक अमीरात ऑफ अफगानिस्तान’ ची केली घोषणा

तालिबानच्या वाटाघाटी करणाऱ्या नेत्यामधील क्रमांक दोनचे नेते दोन स्टँकझाई यांनी अफगाणिस्तानमधील भारताच्या वाढत्या हस्तक्षेपासंबंधीच्या भूमिकेवर टीका केली आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, त्यांनी आपल्या अनौपचारिक संदेशात भारत सरकारला सांगितले की, रविवारी तालिबानच्या अफगाणिस्तान अधिग्रहणानंतर काबूलमधील सुरक्षा सुस्थित आहे. मात्र जगभरातील देशांनी त्यांच्या राजनयिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेची चिंता करण्याचे काही एक कारण नाही ते काबुलमध्ये सुरक्षित आहेत.

ही विनंती भारतासाठी व्यावहारिक आहे का?

लश्कर-ए-तैयबा आणि लष्कर-ए-झांगवीचे बंडखोर काबूलमध्ये होते आणि विमानतळाकडे जाताना चेकपोस्टवरही तैनात होते, या वृत्ताचे मात्र स्टानकझाई यांनी खंडन केले आहे. नेत्याने युक्तिवाद केला की, विमानतळासह सर्व चेक पोस्ट तालिबानच्या ताब्यात आहेत. तथापि, असे म्हटले जात आहे की, भारत हा संदेश व्यावहारिकपणे घेऊ शकत नाही आणि त्यांनी त्यांच्या योजनेनुसार पुढे जावे. अहवालात असेही म्हटले आहे की, काबूलमधील अशरफ घनी सरकारनंतर लष्कर आणि हक्कानी नेटवर्कचे काही सदस्य तालिबान लढाऊ सैनिकांसह काबूलमध्ये घुसले होते. पंतप्रधान मोदींनी निर्देश दिले होते की, भारतीयांची सुरक्षा आणि सुरक्षितरित्या भारतात येणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Mohammed Abbas Stanikzai
Afghan स्वातंत्र्य दिनीच तालिबान्यांनी नागरिकांवर केला अमानुष गोळीबार

भारताने आतापर्यंत कोणतेही उत्तर दिलेले नाही

तालिबानच्या अनौपचारिक विनंतीवर भारतीय अधिकाऱ्यांकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन (Suhail Shaheen) यांनी ट्विट करत सांगितले की, हा गट दूतावास आणि वाणिज्य दूतावासांच्या कामकाजात हस्तक्षेप करणार नाही. त्यांनी ट्विटमध्ये असेही म्हटले आहे की, “आम्ही सर्व मुत्सद्दी, दूतावास, वाणिज्य दूतावास आणि धर्मादाय कर्मचारी यांना आश्वासन देतो की त्यांना सुरक्षित वातावरण दिले जाईल. स्तिनकझाई हे अफगाण सैन्यात अधिकारी होते, त्यांनी 1982-83 दरम्यान डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमी (IMA) मध्ये सुमारे 18 महिने प्रशिक्षण घेतले. अलिकडच्या वर्षांत, तो तालिबानचे एक उच्च वार्ताहर म्हणून उदयास आला आहे. गेल्या 40 वर्षांपासून भारताने अफगाणिस्तानमध्ये "नकारात्मक भूमिका" बजावली असल्याचा आरोप करुन त्यांनी गेल्या वर्षी खळबळ उडवून दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com