India-China Border Fight Video: भारतीय जवानांनी चिनी सैनिकांना झोडून काढले, पाहा व्हिडिओ

भारतीय लष्करी सैनिकांनी चिनी सैनिकांची चांगलीच धुलाई केली.
India-China
India-ChinaDainik Gomantak

India-China Border Fight Video: अरुणाचल प्रदेश येथील तवांग सेक्टरमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली. यावेळी भारतीय लष्करी सैनिकांनी चिनी सैनिकांची चांगलीच धुलाई केली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना झोडून काढले आहे. सध्या सर्वचजण या व्हिडिओचा आनंद घेताना दिसत आहेत.

India-China
India China Conflict: अरुणाचलमध्ये भारत अन् चीनच्या सैनिकांमध्ये चकमक, अनेक भारतीय जवान जखमी

भाजप नेते सुरिन्दर पुनिया यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. 'मी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहतोय. शत्रूला मारताना पाहण्याची मजा काही औरच असते. या व्हिडिओतही शिव्या आहेत… कधी कधी शिव्याही ऐकायला हव्यात. मात्र हा व्हिडीओ कधीचा आहे हे स्पष्ट झालेले नाही. व्हिडिओ जुना असण्याची शक्यता जास्त आहे. होय, यामध्ये भारतीय सैनिक चिनी लोकांना लाठ्या काठ्या आणि काटेरी तारांनी बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे.

India-China
India China Faceoff: तवांग फेसऑफने पुन्हा आठवण करुन दिली... गलवान खोऱ्यातील खूनी झडप!

या व्हिडिओत चिनी सैनिक मोठ्या संख्येने दिसत आहेत आणि भारतीय सैनिक त्यांना काटेरी तारांमध्ये गुंडाळत आहेत. भारतीय सैनिक थोड्या उंचीवर असून, त्याचा त्यांना फायदा होत आहे. भारतीय सैनिक चिनी सैन्यावर वरचढ दिसत आहेत. चिनी सैनिकांवर लाठ्यांचा वर्षाव सुरू होतो. काही काळ जवानांनी तोंडी समजविण्याचा प्रयत्न केला, मात्र चिनी सैनिकांना ते मान्य करत नसल्याने त्यांच्यावर लाठीचार्ज करून भारतीय सैनिकांनी धडा शिकवला.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी भारत आणि चीन पुन्हा एकदा भिडले आहेत. यावेळी अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये ही चकमक झाली. भारतीय सैनिक आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली, ज्यामध्ये अनेक सैनिक जखमी झाले आहेत. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com