Viral Video Of Heart Surgery In Ukraine: युक्रेनमध्ये ब्लॅकआऊट; अत्यंत कमी उजेडात डॉक्टरांनी लहान मुलावर केली हार्ट सर्जरी

रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे युक्रेनच्या राजधानीत अंधकार, हल्ल्यात वीज केंद्रे लक्ष्य
Viral Video Of Heart Surgery In Ukraine:
Viral Video Of Heart Surgery In Ukraine:Dainik Gomantak
Published on
Updated on

Viral Video Of Heart Surgery In Ukraine: सोशल मीडियावर नेहमी अशा गोष्टी पाहायला मिळतात ज्या एरवी सहज कुठे पाहायला मिळत नाहीत. आताही सोशल मीडियात युद्धग्रस्त युक्रेनमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये एका रूग्णलयात अंधारात इमर्जन्सी लाईटच्या उजेडात डॉक्टर शस्त्रक्रिया करताना दिसत आहेत. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून एका लहान मुलाच्या हृदयावर शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे.

Viral Video Of Heart Surgery In Ukraine:
Most Expensive Medicine: 'हे' आहे जगातील सर्वाधिक महागडे औषध

याबाबतचा 2 मिनिटे लांबीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. ट्विटरवर हा व्हिडिओ 15,000 हून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या फुटेजमध्ये दिसते की, शल्य चिकित्सकांचे एक पथक अत्यंत कमी उजेडात ऑपरेशन करत आहे.

रशियाने युक्रेनवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात अनेक शहरात अंधकार झाला आहे. रशियाने युक्रेनमधील वीज केंद्रांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे राजधानी कीव्हमध्येही ब्लॅकआऊट आहे. कीव्हमधील रूग्णालयात वीज नसतानाही युक्रेनी डॉक्टर एका लहान मुलाच्या हृदयावर शस्त्रक्रिया करत आहे. सर्जन्सच्या हातात छोटे-छोटे हेडलँप लावलेले दिसतात. बाकी त्या ऑपरेशन थिएटरमध्ये पुर्ण अंधार आहे. हा व्हिडिओ पाहून युद्धग्रस्त क्षेत्रातील राहणाऱ्या लोकांच्या परिस्थितीचा अंदाज लावता येऊ शकतो.

Viral Video Of Heart Surgery In Ukraine:
Rishi Sunak Daughter Anoushka Performed Kuchipudi: ऋषी सुनक यांच्या लेकीचा यूके इव्हेंटमधील 'कुचीपुडी' पाहिलात का?

शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, कमी उजेडातच शस्त्रक्रिया केली आहे. हृदयात दोन छिद्रे होती. कार्डियोपल्मोनरी बायपास सर्जरी केली गेली. कुणालाच कळले नाही नेमके काय झाले, पण अचानक ऑपरेशन थिएटरमध्ये पुर्णतः अंधार झाला. रशियन्सना आनंद घेऊ द्या. ऑपरेशन टेबलवर एक लहानगा आहे आणि शस्त्रक्रिया सुरू असतानाच लाईट जाते, हे रशियाने चांगले केले, ते खूप मानवतावादी लोक आहेत, असा टोलाही डॉक्टरांनी रशियाला लगावला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com