Most Expensive Medicine: 'हे' आहे जगातील सर्वाधिक महागडे औषध

अमेरिकेने दिली मंजुरी, हीमोफीलियावरील उपचारात ठरणार लाभदायक
Most Expensidve Medicene
Most Expensidve MediceneDainik Gomantak
Published on
Updated on

Most Expensive Medicine In The World : अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) ने नुकतेच जगातील सर्वात महागड्या औषधाला मंजुरी दिली आहे. या औषधाच्या एका डोसची किंमत 3.5 मिलियन डॉलर म्हणजेच 28 कोटी 58 लाख रुपए इतकी आहे. हीमोफीलिया बी या विकाराचा सामना करणाऱ्या रूग्णांवर उपचारासाठी हे औषध वापरले जाणारा आहे. Hemgenix असे या औषधाचे नाव आहे.

Most Expensidve Medicene
Rishi Sunak Daughter Anoushka Performed Kuchipudi: ऋषी सुनक यांच्या लेकीचा यूके इव्हेंटमधील 'कुचीपुडी' पाहिलात का?

काय आहे हीमोफीलिया?

हा एक अनुवंशिक आजार आहे. याचे अनेक प्रकार आहेत. पण त्यात हीमोफीलिया बी दुर्मिळ असतो. यात व्यक्तीच्या रक्तामध्ये एका प्रथिनाची कमतरता दिसून येते. हे प्रथिन रक्त गोठवण्याचे काम करते. या प्रथिनाला 'क्लॉटिंग फॅक्टर' म्हणूनही ओळखले जाते. हा आजार असलेल्या रूग्णाला थोडी जरी जखम झाली तरी त्यातून वाहणारे त्याचे रक्त थांबत नाही. ते एकसारखे वाहत राहते. यात जास्त रक्तस्त्राव होऊन संबंधित रूग्णाचा मृत्यूही होऊ शकतो.

नव्या औषधाने दिलासा

अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनच्या मते Hemgenix हे औषध हीमोफीलिया बी च्या रूग्णांसाठी लाभदायी ठरणार आहे. याच्या एका डोसचा खर्च या रूग्णांना आयुष्यभर कराव्या लागणाऱ्या खर्चाच्या कमी आहे. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेत हीमोफीलियाच्या एका रूग्णावर उपचारासाठी 21 से 23 मिलियन डॉलर म्हणजे सुमारे 171 से 181 कोटी रूपये खर्च येतो. ब्रिटनमध्ये हा खर्च कमी आहे. तथापि, या औषधाचे किती डोस या आजारातून बचावासाठी लागणार आहेत, ही माहिती FDA ने दिलेली नाही. पण या औषधाच्या एका डोसमुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया पुन्हा होते आणि अनेक वर्षे रक्तप्रवाह रोखला जाऊ शकतो.

Most Expensidve Medicene
Twitter Verified: ट्विटरमध्ये आणखी एक महत्वपूर्ण बदल, आता व्हेरिफाईड अकाऊंट तीन रंगात

हीमोफीलियाच्या रूग्णांना त्यांच्या रक्तात क्लॉटिंग फॅक्टर रिप्लेस करावे लागते. प्रत्येक ठिकाणी ही उपचारपद्धती उपलब्ध आहे. यात रूग्णांच्या नसांमध्ये क्लॉटिंग फॅक्टर इंजेक्ट केले जाते. हे आयुष्यभर चालत राहते.

FDA च्या माहितीनुसार जगात हीमोफीलियामुळे 40 हजारपैकी एक जण पीडीत आहे. महिलांपेक्षा पुरूषांमध्ये हा आजार जास्त आढळतो. अमेरिकेत 8 हजार पुरुषांना हा आजार आहे. तर भारतात हीमोफीलियाचे 1 लाख 40 हजार रूग्ण आहेत. दर दहा हजार पुरूषांमध्ये एकाला हा आजार असतो. बहुतांश रूग्णांना हीमोफीलिया ए हा आजार असतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com