Nepal: चीनी परराष्ट्रमंत्र्यांच्या अजेंड्याला नेपाळने दिली मूठमाती, मतभेदाला आवतणं

चीन शेजारील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत सुटला आहे. पाकिस्तानमध्ये (Pakistan) चीनने सीपेक महामार्गाच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक केली आहे.
Nepal
NepalDainik Gomantak
Published on
Updated on

चीन शेजारील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत सुटला आहे. पाकिस्तानमध्ये चीनने सीपेक महामार्गाच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक केली आहे. तर दुसरीकडे श्रीलंका आणि नेपाळमध्येही अनेकविध क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. चीनने श्रीलंकेतील (Sri Lanka) हंबनटोटा बंदर लीजवर घेतले आहे. याच पाश्वभूमीवर चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी नेपाळला भेट दिली आहे. परंतु त्यांचा नेपाळकडून (Nepal) आपेक्षाभंग झाला आहे. वांग यांच्या भेटीनंतर चीन (China) आणि नेपाळने जारी केलेल्या निवेदनातून याचे संकेत मिळाले आहेत. दोन्ही बाजूंकडून स्पष्ट करण्यात आलेल्या निवदेनात फरक होता. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी वांग यांच्या भेटीबाबत एक निवेदन जारी केले. दुसरीकडे नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयानेही रविवारी एक निवेदन जारी केले. (In Nepal the Chinese Foreign Minister's agenda did not successful both sides expressed differences)

दरम्यान, चीन आणि नेपाळमधील चर्चेदरम्यान अमेरिकन संस्था मिलेनियम चॅलेंज कॉर्पोरेशन (MCC) कडून $500 दशलक्ष मदत स्वीकारण्याचा नेपाळ सरकारचा निर्णय हा एक वादग्रस्त मुद्दा म्हणून उदयास आल्याचे संकेत आहेत. एमसीसी कराराला संसदेची मंजुरी मिळण्याच्या मुद्द्यावरुन अमेरिकेने नेपाळला धमकावले तेव्हा चीनने या प्रकरणात उडी घेतली. चीनने अमेरिकेच्या ' परराष्ट्र नितीवर' वर टीका केली.

Nepal
Nepal: सरन्यायाधीशांच्या महाभियोगानंतर आता दुसरे 'भ्रष्ट' न्यायाधीशही निशाण्यावर

नेपाळ BRI पुढे नेण्यास तयार

काठमांडूमध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (Maoist center), वांग यांनी सत्ताधारी आघाडीचा प्रमुख पक्ष असलेल्या शिष्टमंडळाशीही चर्चा केली. या शिष्टमंडळाचा भाग असलेल्या एका नेत्याने काठमांडू पोस्टशी बोलताना सांगितले की, 'चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी नेपाळच्या अमेरिकेसोबतच्या वाढत्या संबंधांवर अप्रत्यक्षपणे चिंता व्यक्त केली. परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, 'आम्ही बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) प्रकल्प हाती घेण्यास तयार आहोत.'

Nepal
Nepal: आचारसंहितेच्या उल्लंघनावरुन नेपाळी सरन्याधीशांविरोधात महाभियोग प्रस्ताव दाखल

दुसरीकडे विरोधी कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळच्या (UML) पक्षानेही वांग यांची भेट घेतली. पक्षाच्या परराष्ट्र धोरण विभागाचे प्रमुख राजन भट्टराई म्हणाले- 'आम्ही चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी कोणत्याही भौगोलिक-राजकीय मुद्द्यावर चर्चा केलेली नाही. आम्ही बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) ची अंमलबजावणी, द्विपक्षीय संबंध मजबूत करणे, दोन्ही देशातील व्यापार पुन्हा सुरु करणे आणि कोरोना महामारीचा उद्रेक झाल्यापासून चीनमध्ये अडकलेले नेपाळी विद्यार्थी हे मुद्दे हाती घेतले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com