Rushi Sunak: ब्रिटनमध्ये 18 व्या वर्षापर्यंत विद्यार्थ्यांना आता 'हा' विषय सक्तीचा, लवकरच होणार घोषणा

पंतप्रधान ऋषी सुनक बदलणार शैक्षणिक धोरण
Rishi Sunak
Rishi SunakDainik Gomantak

Rushi Sunak: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना ब्रिटनमध्ये जगातील सर्वोत्तम शिक्षणपद्धती हवी आहे, त्यामुळे त्यांना शिक्षण धोरणात बदल हवा आहे. त्यामुळे आगामी काळात विश्लेषणात्मक कौशल्यावर भर देण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता ब्रिटनमध्ये 18 वर्षांपर्यंतच्या तरुणांसाठी गणित हा विषय सक्तीचा होणार आहे. पंतप्रधान सुनक लवकरच याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.

Rishi Sunak
NASA Chief on China: नासाच्या प्रमुखांना चीनबाबत वाटतेय ही भीती; चीनी चांद्रमोहिमेबाबत दिला इशारा...

सध्या ब्रिटनमधअये 16 ते 19 या वयोगटातील केवळ निम्मेच युवक गणिताचा अभ्यास करतात. ब्रिटनमध्ये अंदाजे 8 दशलक्ष प्रौढ आहेत. त्यांचे गणितातील कौशल्य अगदी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांशी तुलना करावे असे आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांना इतर विषयांसह गणित विषय अनिवार्य करावा, अशी सुनक यांची योजना आहे. नव्या वर्षातील पहिल्या भाषणात सुनक याबाबतची घोषणा करू शकतात.

सुनक यांचे गणित विषयावर लक्ष केंद्रित करणे हे ब्रिटनचे चांगले भविष्य घडवण्यास मदत करण्याच्या दृष्टीकोनाचा एक भाग आहे. सुनक म्हणतात की, हे माझ्यासाठी वैयक्तिक आहे. आज मला ज्या काही संधी मिळाल्या आहेत, त्या माझ्या शिक्षणामुळे मिळाल्या आहेत. आगामी काळात प्रत्येक कामात डेटा आणि आकडेवारीवर भर दिला जाणार आहे. म्हणूनच मुलांमध्ये विश्लेषणात्मक कौशल्ये असायला हवीत.

Rishi Sunak
Russia Ukraine War: युक्रेनच्या वैमानिकाने सांताक्लॉजच्या वेशात विमानातून डागली क्षेपणास्त्रे...

सुनक यांना विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांसह गणित अनिवार्य करावे असे वाटते. याचा अर्थ वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत ए-लेव्हल (प्रगत स्तर पात्रता) पेक्षा वेगळ्या माध्यमातून गणित शिकवणे. दरम्यान, पुढील निवडणुकीपूर्वी नवीन धोरण लागू केले जाणार नाही, अशी शक्यता आहे. ब्रिटनमध्ये पुढील सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये होणार आहे.

सुनक यांनी गुन्हेगारांविरोधात मोहीम सुरू केली आहे. त्यांना महिलांसाठी सुरक्षित वातावरण द्यायचे आहे. तसेच 5 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना शालेय पुस्तकांतून कृष्णवर्णीयांच्या योगदानाचे धडे दिले जाणार आहेत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com