बांगलादेशात जमावाकडून हिंदू मंदिराची तोडफोड, पैसे अन् मौल्यवान वस्तू लुटल्या

बांगलादेशची (Bangladesh) राजधानी असलेल्या ढाकामध्ये गुरुवारी होळीच्या निमित्ताने 150 लोकांच्या जमावाने एका हिंदू मंदिराची तोडफोड केली आहे.
Hindu Temple
Hindu TempleTwitter / ANI
Published on
Updated on

बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाकामध्ये गुरुवारी होळीच्या निमित्ताने 150 लोकांच्या जमावाने एका हिंदू मंदिराची (Hindu Temple) तोडफोड केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, ढाकामधील (Dhaka) इस्कॉन राधाकांता मंदिरावर हा हल्ला झाला आहे. देशातील अल्पसंख्याक हिंदू समाजाच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या ‘व्हॉइस ऑफ बांगलादेशी हिंदू’ या संस्थेने हल्ल्यानंतरचे काही फोटो शेअर केले आहेत. त्याचबरोबर मदतीचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. (In Bangladesh a mob of 150 people vandalized a Hindu temple)

दरम्यान, आपल्या ट्विटमध्ये व्हॉईस ऑफ बांगलादेशने (Bangladesh) लिहिले की, 'शब-ए-बारातच्या रात्री अतिरेक्यांनी पुन्हा एकदा ढाकामधील वारी राधाकांता इस्कॉन मंदिरावर हल्ला केला. आम्ही सर्व हिंदूंना मंदिराच्या रक्षणासाठी आपली भूमिका बजावण्याचे आवाहन करतो.' या ट्विटर हँडलवर हल्ल्याशी संबंधित काही फोटोही शेअर करण्यात आले आहेत. ढाकातील इस्कॉन मंदिरावर अतिरेकी गट हल्ला करत असताना पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा दावाही संघटनेने केला आहे.

Hindu Temple
Russia-Ukraine War: स्लोव्हाकियाच्या संसदेने NATO च्या तैनातीला दिली मान्यता

रात्री आठच्या सुमारास हा हल्ला झाला

या प्रकरणी हिंदू अमेरिकन फाउंडेशन (HAF) ने अधिकृत वेबसाईटवर एक प्रेस रिलीझ देखील जारी केले आहे. ज्यामध्ये हाजी सफिउल्लाह यांच्या नेतृत्वाखाली 150 लोकांनी ढाक्याच्या वारी पोलीस ठाण्यातील 22 लालमोहन साहा स्ट्रीटवर असलेल्या इस्कॉन मंदिरावर हल्ला केल्याचे सांगितले. ही घटना 17 मार्च रोजी रात्री 8 वाजता घडली. एचएएफच्या वतीने सांगण्यात आले आहे की, 'त्यांनी मंदिर, मूर्तीची तोडफोड केली. त्यानंतर पैसे आणि इतर मौल्यवान वस्तू लुटल्या. या हल्ल्यात तीन हिंदू भाविक जखमी झाले आहेत.

काय म्हणाले मानवाधिकार संचालक?

हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'मंदिरावर 150 लोकांच्या जमावाने हल्ला केला होता. ज्यामध्ये तीन जण जखमी झाले आहेत. एचएएफच्या मानवाधिकार संचालिका दिपाली कुलकर्णी म्हणाल्या, “एका आठवड्यापूर्वी, बांगलादेशातील बंगाली हिंदू नरसंहारादरम्यान ज्यांना मारले गेले, विस्थापित केले गेले आणि बलात्कार करण्यात आले त्यांची 51 वी जयंती संपूर्ण जगाने साजरी केली. मात्र या हत्याकांडाचा प्रभाव आजही कायम असल्याची आठवण अतिरेकी करत आहेत.

Hindu Temple
Ukraine Russia War: युक्रेनमधील विध्वंसानंतर NATO देश अ‍ॅक्शनमध्ये !

इस्कॉन कोलकाता यांनी निषेध केला

ढाका मंदिरावरील हल्ल्यावर इस्कॉन कोलकाताचे (Kolkata) उपाध्यक्ष राधारमण दास म्हणाले, 'हे हल्ले गंभीर चिंतेचा विषय आहेत. आम्ही बांगलादेश सरकारला विनंती करतो की, तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच देशातील हिंदू अल्पसंख्याकांना सुरक्षा प्रदान करावी. काल संध्याकाळी भाविक गौर पौर्णिमा उत्सवाच्या तयारीत असताना ढाकामधील श्री राधाकांता मंदिराच्या आवारात 200 लोकांच्या जमावाने घुसून त्यांच्यावर हल्ला केला. त्यात 3 जण जखमी झाले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. परंतु हल्लेखोरांना पळून जाण्यात यश आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com