Blast in Afghanistan: हेरात शहरात भीषण बॉम्बस्फोट; 12 ठार, 25 जण जखमी

अफगाणिस्तानच्या (Afghanistan) पश्चिम प्रांतातील हेरात शहरात शुक्रवारी भीषण बॉम्बस्फोट झाला. ज्यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत.
Blast
BlastDainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तानच्या पश्चिम प्रांतातील हेरात शहरात शुक्रवारी भीषण बॉम्बस्फोट झाला. ज्यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. स्थानिक न्यूज वेबसाइट टोलो न्यूजनुसार, प्रांतातील आरोग्य कर्मचार्‍यांनी सांगितले की, हेरात शहरातील पीडी 12 च्या बॉम्बस्फोटात 12 लोक ठार तर 25 जण जखमी झाले आहेत. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानमध्ये अशरफ घनी (Ashraf Ghani) यांचे लोकशाहीवादी सरकार उलथवून लावत तालिबान्यांनी (Taliban) आपली सत्ता स्थापन केली. तेव्हापासून देशभरात हल्ल्यांचे सत्र वाढले. यापैकी अनेक हल्ल्यांची जबाबदारी जागतिक दहशतवादी संघटना असणाऱ्या इस्लामिक स्टेट (Islamic State) ने स्वीकारली आहे. त्याची अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) ISK-P, इस्लामिक स्टेट-खोरासान या नावाने शाखा आहेत. तालिबान्यांनी सत्ता स्थापन केल्यापासून ही संघटना अधिक मजबूत झाली आहे. (In a bomb blast in Afghanistan 12 people killed and injured 25 others)

यापूर्वीही बॉम्बस्फोट झाले होते

टोलो न्यूजनुसार, जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाही हेरात शहरात स्फोट झाला होता, ज्यामध्ये 7 लोक ठार आणि 9 जण जखमी झाले होते. हेरात प्रांताची (Herat Province) राजधानी असणाऱ्या हेरात शहरात PD 12 ला लक्ष्य करुन मिनीबसवर बॉम्ब हल्ला करण्यात आला होता. यामध्ये चार महिलांचा मृत्यू झाल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते. याशिवाय अफगाणिस्तानातील अनेक शिया मशिदींमध्ये बॉम्बस्फोट झाले आहेत. ज्यात शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Blast
Afghanistan: तालिबानला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळणार?

हेलमंडमध्ये मोर्टार शेलचा स्फोट

एक दिवस आधी, शुक्रवारी अफगाणिस्तानच्या दक्षिणेकडील हेलमंड प्रांतात मोर्टार शेलचा स्फोट होऊन पाच मुले ठार तर दोन जण जखमी झाले. तालिबानच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. हेलमंडच्या माहिती आणि संस्कृती विभागाचे अब्दुल बारी रशीद हेलमंडी यांनी सांगितले की, 'मारझा जिल्ह्यात तीन ते 12 वर्षे वयोगटातील मुले खेळत होती, त्यावेळी त्यांना एक चेंडू सापडला असावा. मुले या चेंडूशी खेळत असताना अचानक त्याचा स्फोट झाला.' स्थानिक परिषदेचे माजी सदस्य अहमदउल्ला यांनी सांगितले की, 'इतर दोन मुलांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com