Imran Khan यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी, अटकेची टांगती तलवार कायम

Imran Khan Non Bailable Warant: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत.
Imran Khan
Imran KhanDainik Gomantak
Published on
Updated on

Imran Khan Non Bailable Warant: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत.

त्यांच्यावर पुन्हा एकदा अटकेची टांगती तलवार आहे. बुधवारी इस्लामाबाद न्यायालयाने खान यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले.

वास्तविक, इम्रान यांनी सुनावणीतून सूट देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांची याचिका दिवाणी न्यायाधीश मलिक अमान यांनी फेटाळून लावली.

तसेच न्यायालयाने इम्रान खान यांना 18 एप्रिल रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. 24 मार्च रोजी न्यायालयाने (Court) अजामीनपात्र वॉरंटचे जामीनपात्र वॉरंटमध्ये रुपांतर केले. त्यानंतर बुधवार, 29 मार्च रोजी त्यांना हजर राहायचे होते, मात्र ते न्यायालयात पोहोचले नाहीत.

Imran Khan
Imran Khan: पाकिस्तानात खूनी राजकारण, मरता-मरता वाचले इम्रान खान; वाचा नेमकं प्रकरण

वकील म्हणाले- इम्रान यांच्या जीवाला धोका आहे

सुनावणीदरम्यान, इम्रान यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, पीटीआय प्रमुख इम्रान खान (Imran Khan) यांच्याविरुद्ध जारी केलेले जामीनपात्र वॉरंट कायम ठेवावे. त्यांच्या जीवितास आणि मालमत्तेला धोका आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयानेही त्यांच्याकडून सुरक्षा काढून घेण्याची नोटीस बजावली आहे.

Imran Khan
Imran Khan: माझ्या हत्येसाठी झरदारींनी दहशतवाद्यांना पैसे दिले... इम्रान खान यांचा आरोप

महिला न्यायाधीशांना धमकावण्यात आले

हे संपूर्ण प्रकरण इम्रान खान यांच्या गेल्या वर्षीच्या भाषणाशी संबंधित आहे. ज्यामध्ये त्यांनी कथितरित्या पोलीस आणि महिला न्यायाधीश जेबा यांना धमकावले होते, जेव्हा त्यांचे जवळचे सहकारी शाहबाज गिलला देशद्रोहाच्या खटल्यात जामीन नाकारण्यात आला होता. या प्रकरणात इम्रान खान यांना किमान 5 वर्षांसाठी अपात्र ठरवले जाऊ शकते.

इम्रान खान यांचे सरकार गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पडले. त्यांना सभागृहात विश्वासदर्शक ठराव मांडता आला नाही. सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com