Imran Khan: पाकिस्तानचे तत्कालिन पंतप्रधान इमरान खान यांच्या अटकेचे प्रकरण चांगलेच तापले असल्याची माहिती मिळत होती. आता मिळालेल्या माहितीनुसार, लाहोरकडून इस्लामाबादला निघालेल्या त्यांच्या गाडीचा अपघात झाला आहे.
इमरान खान यांना अटक करण्यात यावी असे कोर्टाने आदेश दिले होते. कोर्टाच्या या आदेशानंतर इस्लामाबाद पोलिस इमरान खान यांना अटक करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानावर पोहोचली होती.
इमरान खान यांचे समर्थक आधीपासूनच त्यांच्या घराबाहेर उपस्थित होते. पोलिस आणि समर्थक यांच्यामध्ये इमरान खानच्या अटकेवरुन मोठा वाद निर्माण झाला होता. समर्थकांनी इमरान खान यांना अटक करण्याला विरोधकेल्याने पोलिस विरुद्द समर्थक असा वाद सुरु झाला.
समर्थकांना आटोक्यात आणण्यासाठी आणि हिंसा टाळण्यासाठी पोलिसांनी अश्रूधारी नळकांडीचा वापर केल्याची माहीती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तोशखाना प्रकरणासाठी इमरान खान लाहोरवरुन इस्लामाबादला जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी त्यांच्या गाड्यांच्या कळपातील गाड्या एकमेकांवर आदळ्याने अपघात झाला आहे. त्यातील एक गाडी पलटल्याचे देखील दिसून आले आहे.
दरम्यान, अपघात झालेल्या दोन गाड्यांमध्ये पाकिस्तान( Pakistan )चे तत्कालीन पंतप्रधान इमरान खान नसून ते सुरक्षित आहेत.
तीन लोक जखमी झाले आहेत. इमरान खान( Imran Khan )ने असेही म्हटले आहे की, तोशखाना प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर शहबाज सरकार त्यांना अटक करण्याच्या तयारीत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.