पाकिस्तानात अल्पसंख्याक समुदयाविरोधात पुन्हा एकदा हिंसाचार

जे इम्रान खान सरकार (imran khan government) पाकिस्तानमधील अल्पसंख्याक समुदायाचे संरक्षण करण्याचे आश्वासन देत असते.
Pakistan
PakistanDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानातील (Pakistan) अल्पसंख्याक समुदायाविरोधात पुन्हा एकदा हिंसाचार दिसून आला आहे. सिंध प्रांतातील (Sindh Province) शिया कुटुंबांच्या (Shia Families) घराबाहेर घोषणाबाजी (Chanting Slogan) करण्यात आली आहे. शेजारच्या देशात, तेहरिक-ए-लबाइक (Tehreek-E-Labbaik) या बंदी घातलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ओरंगी शहरात त्यांच्या घराबाहेर शिया समुदायाविरोधात घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे इम्रान खान (Imran Khan) सरकार पुन्हा एकदा तोंडावर पडले आहे. जे इम्रान खान सरकार पाकिस्तानमधील अल्पसंख्याक समुदायाचे संरक्षण करण्याचे आश्वासन देत असते.

दरम्यान, या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ओरंगी टाऊनच्या (Orangi Town) परिसरात लोकांची गर्दी जमताना दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती म्हणते, 'ज्याने दुष्ट कृत्य केले त्याच्या घराजवळ आम्ही उपस्थित आहोत.' यात लोक धार्मिक घोषणा देताना दिसून येत आहेत. यापूर्वीही बंदी घातलेल्या तेहरीक-ए-लब्बाईकच्या कार्यकर्त्यांनी देशात खळबळ उडवून दिली आहे. शार्ली हेब्दो या फ्रेंच नियतकालिकाच्या विरोधात पाकिस्तानात एप्रिल महिन्यात निदर्शने झाली. या दरम्यान, सरकारने तहरीक-ए-लब्बाईकचे प्रमुख साद रिझवी यांना अटक केली, त्यानंतर कार्यकर्त्यांनी देशभरात जाळपोळ सुरू केली.

Pakistan
UNHCR: अफगाणिस्तानमधील परिस्थिती बिघडली तर, 5 लाख लोक देश सोडू शकतात?

एलपी कामगारांनी रणजीत सिंह यांच्या पुतळ्याची तोडफोड केली

याआधी, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील लाहोर किल्ल्यावर प्रथम शिख शासक महाराजा रणजीत सिंह यांच्या नऊ फूट उंच कांस्य पुतळ्याची 17 ऑगस्ट रोजी बंदी घातलेल्या तेहरीक-ए-लब्बाईक पाकिस्तान (TLP) च्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. त्याचाही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये आरोपी घोषणा देताना आणि घोड्यावरून सिंहांचा पुतळा खाली आणताना मूर्तीचा हात मोडताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये असेही दाखवण्यात आले की, या दरम्यान दुसरी व्यक्ती येते आणि पुतळ्याचे नुकसान करणाऱ्या व्यक्तीला थांबवते. 'द एक्सप्रेस ट्रिब्यून' या वृत्तपत्राने या कार्यकर्त्यांना पंजाब पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त दिले आहे. लाहोर किल्ला प्रशासनाने सांगितले की, आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल.

Pakistan
मसूद अझहरने घेतली तालिबान्यांची भेट; काश्मीरप्रश्नी मदतीची केली याचना

पाकिस्तानी नेत्यांनी कडक कारवाईची मागणी केली होती

या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी एका ट्विटमध्ये म्हटले होते की, अशिक्षित व्यक्ती पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेसाठी खरोखर धोकादायक आहे. पंतप्रधान इम्रान खान यांचे राजकीय सल्लागार डॉ शाहबाज गिल यांनी सांगितले की, आरोपींवर त्वरित कारवाई केली जाईल. वृत्तपत्राने गिलच्या हवाल्याने म्हटले आहे, "ही आजारी मानसिकतेची लक्षणे आहेत. पाकिस्तानचे मूल्यांकन कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. शीख शासक महाराजा रणजीत सिंह यांचा हा पुतळा नऊ फूट उंच होता. यामध्ये तो पूर्ण शीख वेशात, हातात तलवार घेऊन घोड्यावर बसलेला दाखवला आहे. जून 2019 मध्ये या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com