Pakistan Economic Crisis: आयएमएफने दिला पाकिस्तानला दणका !

Pakistan: आयएमएफ( IMF)चे निर्देश लागू केले तर आधीच वाढलेली महागाई आणखी वाढेल. यामुळे जनता आणि विरोधी पक्ष आक्रमक होईल असे शरीफ सरकारने म्हटले आहे.
Pakistan Economic Crisis
Pakistan Economic CrisisDainik Gomantak

Pakistan Economic Crisis: पाकिस्तान मागच्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. दैनंदीन जीवन जगण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. आर्थिक प्रश्नांचा सामना करण्यासाठी पाकिस्तानच्या सरकारने आएमएफ ( IMF ) कडे मदत मागितली होती.

आयएमएफने कर्ज द्यावे यासाठी पाकिस्तानने अर्ज केला होता. मात्र आयएमएफने पाकिस्तानला कर्ज देण्यासाठी एक अट समोर ठेवली आहे.

पाकिस्तानने देशातील वीजेवरील सबसीडी बंद करावी आणि प्रतियुनिट 12.50 रुपए इतकी वाढ करावी ,त्यानंतर आयएमएफ कर्ज देण्याविषयी विचार करेल असे म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानला आपल्या नागरिकांना वीजेवरील सबसीडी देण्यासाठी बिलियन पाकिस्तान रुपयांचे नुकसान झेलावे लागते. नोव्हेंबर 2022 मध्येदेखील आएमएफने पाकिस्तान( Pakistan)ने आपला खर्च कमी केला तरच आपण कर्ज देऊ असे सांगितले होते.

Pakistan Economic Crisis
Pakistan: मी इमरान खानबरोबर आहे, हाच माझा गुन्हा- शेख राशिद यांची अटकेनंतर प्रतिक्रिया

आयएमएफने 500 अरब रुपए सर्क्युलर कर्ज संपविण्यासाठी तसेच वीजेवरील किंमती वाढवून नवे कर लागू करण्यासाठी निर्देश दिले आहेत. आयएमएफ( IMF)चे निर्देश लागू केले तर आधीच वाढलेली महागाई आणखी वाढेल. यामुळे जनता आणि विरोधी पक्ष आक्रमक होईल असे शरीफ सरकारने म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयएमएफची एक टीम पाकिस्तानच्या परिस्थितीचा अभ्यास करत आहे. पाकिस्तानला विश्वास आहे या समीक्षेनंतर आयएमएफ पाकिस्तानला कर्ज देईल.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये नागरिकांचे हाल होत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. काही ठिकाणी प्लॅस्टिकच्या बॅगमधून सीएनजी दिल्याच्या घटना समोर आल्या होत्या. आता पाकिस्तान आयएमएफचे निर्देशांचा अवलंब करणार का आणि आयएमएफकडून कर्ज मिळवणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com