Pakistan: मी इमरान खानबरोबर आहे, हाच माझा गुन्हा- शेख राशिद यांची अटकेनंतर प्रतिक्रिया

Pakistan: इस्लामाबादच्या आबापुरी पोलीस स्टेशनमध्ये शेख राशिद यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र शेख राशिद यांच्या भाच्याने राशिद यांना रावळपिंडींच्या घरातून अटक केल्याचे म्हटले आहे.
Pakistan
PakistanDainik Gomantak

Pakistan: पाकिस्तानचे माजी मंत्री शेख राशिद अहमद यांना अटक करण्यात आली आहे. शेख राशिद अहमद हे आवामी मुस्लीम लीगचे प्रमुख आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मूरी मोटरवे येथून त्यांना अटक करण्यात आले आहे.

शेख राशिद यांना आसिफ अली जरदारी यांच्यावर आरोप केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. शेख राशिद अहमद यांना इमरान खान यांचे निकटवर्तीय मानले जाते. राशिद यांच्यामते, मी इमरान खान यांच्याबरोबर असल्याने मला अटक करण्यात आली आहे.

याआधी इमरान खानच्या मंत्रीमंडळातील मंत्री फवाद चौधरी यांनादेखील याआधी अटक केली होती. इस्लामाबादच्या आबापुरी पोलीस स्टेशनमध्ये शेख राशिद यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती मात्र शेख राशिद यांच्या भाच्याने राशिद यांना रावळपिंडींच्या घरातून अटक केल्याचे म्हटले आहे.

रावळपिंडीतील पाकिस्तान( Pakistan) पीपल्स पार्टीचे अध्यक्ष राजा इनायत उर रहमान यांनी शेख राशिद अहमद यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. शेख राशिद अहमद यांनी पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांनी इमरान खान यांच्या हत्येचा कट केल्याचा म्हटले होते.

आसिफ अली जरदारी आपल्याला मारण्याचा कट करत होते. त्याबरोबर,आतंकवाद्यांनादेखील माझी सुपारी दिली होती असा आरोप इमरान खान यांनी आसिफ अली जरदारी यांच्यावर केला होता.

Pakistan
Peshawar Attack: मुजाहिद्दीन दहशतवादीच..., अखेर पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांचीच कबुली

दरम्यान, पोलीसांनी माझ्यासोबत चुकीचे केले आहे. मला त्यांनी माझ्या घरातून अटक केले आहे. माझा फक्त एवढाच गुन्हा आहे की मी इमरान खान यांना साथ दिली आहे मी त्यांच्यासोबत आहे. मी 16 वेळा मंत्री राहीलो आहे आणि माझ्यावर एकदासुद्धा भ्रष्टाचाराचा आरोप नाही असेही शेख राशिद अहमद यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com