इटलीमध्ये असे कपडे घातले तर भरावा लागेल 40 हजारांचा दंड; महापौरांनी काढले आदेश

इटलीमध्ये महिलांना पर्यटनस्थळांवर बिकिनी घालण्यास बंदी आहे.
Italy
ItalyDainik Gomantak

तसं, अनेक पर्यटन स्थळांवरती कोणतेही कपडे परिधान करू शकतो. पण इटलीमध्ये (Italy) महिलांना पर्यटनस्थळांवर बिकिनी घालण्यास बंदी आहे. जर कोणी असे केले तर त्याला मोठा दंड ठोठावला जातो. दंड म्हणून त्या व्यक्तीला 40 हजारांपेक्षा जास्त रक्कम भरावी लागते. (If you wear such clothes in Italy you will have to pay a fine of Rs 40000 Orders issued by the mayor)

Italy
शिंजो आबे यांना का घातल्या गोळ्या? शूटरने दिली पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली

हे लोक कमी कपडे घालून 'अभद्र वर्तन' करतात, असे तेथील बीचच्या बाजूला राहणाऱ्या लोकांनी सांगितले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना गैरसोय होत आहे. हे पाहता, ‘शॉर्ट कपड्यांमध्ये’ कोणी ‘अशोभनीय’ वर्तन करताना आढळल्यास त्याला 425 पौंड (40 हजार रुपयांहून अधिक) दंड ठोठावण्यात येईल, असा इशारा येथील महापौरांनी दिला आहे.

महापौर म्हणाले की, पर्यटकांच्या वर्तनामुळे किनारपट्टीवरील शहराची "प्रतिष्ठा" आणि "जीवनाचा दर्जा" खराब होत असल्याची भीती स्थानिकांना वाटते आहे. अशा परिस्थितीत नियमांचे पालन व्हावे यासाठी पोलीस अधिकारी रस्ते आणि किनारी भागात गस्त घालणार आहेत. शर्टलेस किंवा स्विमवेअरमध्ये आढळलेल्यांना दंड आकारला जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com