Viral Video: Iceland मध्ये एका तासात 150 तर 14 तासांत भूकंपाचे 800 धक्के

Iceland Earthquakes: आइसलँडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून देशात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. तर आतापर्यंत भूकंपाचे सुमारे 24 हजार धक्के जाणवले आहेत. नुकतेच देशात तासाभरात सुमारे दीडशे धक्के बसले. त्यामुळे आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
Iceland Earthquakes
Iceland EarthquakesDAINIK GOMANTAK
Published on
Updated on

Iceland faces 150 earthquakes in one hour, 800 in 14 hours, emergency declared:

आइसलँड ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या टोकावर उभे आहे. देशाच्या दक्षिण-पश्चिम रेकजेनेस द्वीपकल्पात ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून देशात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. आतापर्यंत सुमारे 24 हजार भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तर नुकतेच देशात तासाभरात सुमारे दीडशे धक्के बसले.

परिस्थिती पाहता देशात सरकारने आणीबाणी जाहीर केली आहे. पोलिसांनी शुक्रवारी ग्रिंडाविककडे जाणारा उत्तर-दक्षिण रस्ता बंद केला.

नागरी संरक्षण आणि आणीबाणी व्यवस्थापन विभागाने सांगितले की, राष्ट्रीय पोलीस प्रमुखांनी ग्रिन्डाविकच्या उत्तरेकडील सुंधनजुक्कगीर येथे भूकंपाच्या हालचालींमुळे नागरी संरक्षणाच्या दृष्टीने आपत्कालीन स्थिती घोषित केली.

आइसलँड सरकारने इशारा दिला आहे की, आतापर्यंत अनुभवलेल्या भूकंपांपेक्षा हे भूकंप मोठे असू शकतात आणि या घटनांमुळे ज्वालामुखीचा उद्रेक होऊ शकतो.

आइसलँडिक हवामान कार्यालयानुसार, येत्या काही दिवसांत ज्वालामुखीचा उद्रेक होऊ शकतो. भूकंपाचे धक्के आणि ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे सर्वाधिक नुकसान सुमारे ४ हजार लोकसंख्येच्या ग्रिन्डाविक गावाचे होईल, जे ज्वालामुखी क्षेत्राच्या दक्षिण-पश्चिमेस ३ किलोमीटर (१.८६ मैल) अंतरावर आहे.

शनिवारी राजधानी रेकजाविकपासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर आणि देशाच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर दोन तीव्र भूकंप जाणवले.

Iceland Earthquakes
Israel-Hamas War: इस्रायलवरील हल्ल्यात इराणाचा हात? हमासला तेहरानकडून शस्त्रे मिळाल्याचा खळबळजनक दावा

एका तासात 150 तर 14 तासांत भूकंपाचे 800 धक्के

IMO च्या प्राथमिक माहितीनुसार, सर्वात मोठा धक्का ग्रिन्डाविकच्या उत्तरेला 5.2 तीव्रतेचा होता. नैऋत्य आइसलँडमध्ये भूकंपाचे अनेक धक्के बसले. ज्यामुळे तज्ञांना ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची चिंता निर्माण झाली आहे.

तासाभरात या भागात दीडशेहून अधिक भूकंपाचे धक्के बसले. ऑक्टोबरच्या अखेरीपासून, द्वीपकल्पात सुमारे 24 हजार भूकंप झाले आहेत.

शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुमारे 800 भूकंपाचे धक्के बसले आहेत. लावा पृथ्वीपासून 3 किलोमीटर (3.1 मैल) खोलीवर उकळत आहे, जर तो पृष्ठभागाकडे सरकू लागला तर ज्वालामुखीचा उद्रेक होऊ शकतो.

या पार्श्वभूमीवर पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंद करण्यात आली आहेत.

Iceland Earthquakes
Nawaz Sharif: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, जाणून घ्या पुढे काय होणार?

आइसलँड हा जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखी असलेला देश आहे. येथे सुमारे 30 सक्रिय ज्वालामुखी आहेत.

जुलैमध्ये, Fagradalsfjall's Little Hruttur, किंवा Little Ram, ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि त्यामुळे जगभरातील पर्यटक आकर्षित झाले होते.

2021, 2022 आणि 2023 मध्ये येथे सतत ज्वालामुखीचा उद्रेक होत होता. याआधी हा ज्वालामुखी आठ शतके निष्क्रिय होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com