Akshay Nirmale
नेदरलँडमधील बिनेनहॉफ ही जगातील सर्वात जुनी संसदेची इमारत आहे. ती 13 व्या शतकात बांधली गेली आहे.
इटलीतील संसद पलाझो मडाम्माची इमारत 16 व्या शतकात बांधली गेली होती.
फ्रान्सची संसद लक्झमबर्ग पॅलेसचे बांधकाम 17 व्या शतकात झालेले आहे.
आईसलँडची संसद अल्थिंगीशुसिदचे बांधकाम 1881 मध्ये झाले आहे.
अमेरिकेत संसदेचे कामकाज कॅपिटॉल बिल्डिंगमधून चालते. या इमारतीचे बांधकाम 18 सप्टेंबर 1793 रोजी सुरू झाले. ती 17 नोव्हेंबर 1800 रोजी खुली करण्यात आली.
ब्रिटनच्या संसदेचे नाव पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर असे आहे. या इमारतीचे बांधकाम 1876 मध्ये पूर्ण झाले आहे.
चीनची संसद ग्रेट हॉल ऑफ द पीपल या इमारतीचे बांधकाम 20 व्या शतकात झाले आहे.
भारतातील जुने संसद भवन ब्रिटिशांनी 1927 मध्ये बांधले होते.