अमेरिकेच्या शेजारील देशात बंदूकधाऱ्यांचा अंदाधुंद गोळीबार, 19 मजूर आणि 6 पोलिसांसह 25 जणांची निर्घृण हत्या; सुरक्षा यंत्रणा हादरली

Honduras Shooting 25 Killed: अमेरिकेचा शेजारी देश असलेल्या होंडुरासमधून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली.
Honduras Shooting 25 Killed
Honduras ShootingDainik Gomantak
Published on
Updated on

Honduras Shooting 25 Killed: अमेरिकेचा शेजारी देश असलेल्या होंडुरासमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. देशातील दोन वेगवेगळ्या भागांत बंदूकधाऱ्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 6 पोलीस अधिकाऱ्यांसह 25 जणांचा मृत्यू झाला. या भीषण हिंसेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले.

पहिली रक्तरंजित घटना उत्तर होंडुरासच्या ट्रुझिलो नगरपालिकेत घडली. येथील एका मोठ्या बागेत काही मजूर काम करत असताना अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या गोळीबारात 19 निष्पाप मजुरांचा जागीच मृत्यू झाला. हा परिसर नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असला, तरी गेल्या अनेक दशकांपासून शेती आणि जमिनीच्या वादावरुन चालणाऱ्या संघर्षाचे मुख्य केंद्र राहिला आहे.

Honduras Shooting 25 Killed
Iran America War: इराणकडून तीन जहाजांवर पुन्हा एकदा गोळीबार, दोन जहाजे घेतली ताब्‍यात; शस्त्रसंधीला अमेरिकेची मुदतवाढ

दुसरी घटना ग्वाटेमाला सीमेच्या जवळ असलेल्या ओमोआ नगरपालिका परिसरात घडली. राष्ट्रीय पोलिसांचे प्रवक्ते एडगार्डो बाराहोना यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोर्टेस विभागातील ओमोआ येथे बंदूकधाऱ्यांनी थेट पोलिसांच्या ताफ्यालाच आपले लक्ष्य केले. या भीषण हल्ल्यात एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह 6 पोलीस कर्मचाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हे सर्व पोलीस (Police) अधिकारी टोळी-विरोधी मोहिमेवर तैनात होते. राजधानी तेगुसिगाल्पा येथून ओमोआकडे जात असताना वाटेतच दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. या गोळीबारात पोलिसांना सावरण्याची संधीही मिळाली नाही आणि 6 जणांना आपला जीव गमवावा लागला.

Honduras Shooting 25 Killed
America Iran War: "दररोज 6900 कोटींचा धूर!" इराणशी नडणं डोनाल्ड ट्रम्पला भोवलं; युद्ध लांबल्यास अमेरिकेला बसणार 18 लाख कोटींचा तडाखा

या दोन्ही घटनांनंतर स्थानिक प्रशासनाने आणि तपास यंत्रणांनी तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली. मजुरांच्या हत्येबाबत बोलताना प्रवक्त्यांनी सांगितले की, मृतांचा अधिकृत आकडा स्पष्ट करण्यात काही अडचणी येत आहेत; कारण घटनेनंतर पीडित मजुरांच्या नातेवाईकांनी कायदेशीर प्रक्रियेची वाट न पाहता अनेक मृतदेह घटनास्थळावरुन स्वतःच हटवले आहेत. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी सुरक्षा मंत्रालयाने कडक पावले उचलली असून राष्ट्रीय पोलीस आणि सशस्त्र दलांना दोन्ही प्रभावित क्षेत्रांत तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.

Honduras Shooting 25 Killed
India America Trade War: "मोदींशी लवकरात लवकर बोला'', ट्रम्प यांना खासदारांचं पत्र, भारत-अमेरिका 'ट्रेड वॉर'मध्ये आता डाळींचा पेच, कोण घेणार पुढाकार?

हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी आणि पुराव्या गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि सरकारी वकिलांचा समावेश असलेल्या विशेष तपास पथकांची स्थापना करण्यात आली. या दुहेरी हल्ल्यामुळे होंडुरासमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com