Canada: दिवाळीच्या जल्लोषात खलिस्तान समर्थक आणि भारतीय भिडले; झाला मोठा राडा

दिवाळीनिमित्त आयोजित पार्टीत खलिस्तान समर्थकांनी जबरदस्तीने प्रवेश केला.
Canada
CanadaDainik Gomantak
Published on
Updated on

कॅनडामध्ये दिवाळी साजरी करताना खलिस्तान समर्थक आणि भारतीय यांच्यात हिंसक वाद झाला. मिसिसॉगामध्ये खलिस्तान समर्थकांची भारतीय समुदायातील लोकांशी झटापट झाली. दिवाळीनिमित्त आयोजित पार्टीत खलिस्तान समर्थकांनी जबरदस्तीने प्रवेश केला. खलिस्तानच्या समर्थकांनी भारतीय समुदायाच्या लोकांना मारहाण देखील केली.

खलिस्तानी समर्थक आणि भारतीय यांच्यात झालेल्या संघर्षाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात एकीकडे लोक तिरंगा फडकवताना दिसत आहेत तर दुसरीकडे खलिस्तानी समर्थक खलिस्तानचा झेंडा फडकवत आहेत.

Canada
Mass Grave In UK: जुन्या इमारतीखाली सापडले 300 सांगाडे ; ब्रिटनमध्ये खळबळ

मंदिरांवर हल्ले करणे आणि भिंतींवर खलिस्तानी नारे लिहिण्याचे प्रकार यापूर्वीही कॅनडातील खलिस्तानी समर्थकांनी केले आहेत. खलिस्तानचे समर्थन करणारे आणि खलिस्तान चळवळीशी संबंधित असलेले अनेक नेते कॅनडात राहतात आणि तेथे उघडपणे भारतविरोधी कारवाया करतात. खलिस्तानी समर्थकांनी दिवाळीच्या मुहूर्तावर कॅनडात भारतीय समुदायाच्या लोकांवर हल्ला केला तेव्हा पोलीस तिथे उपस्थित होते पण त्यांनी या लोकांना रोखले नाही, असे सांगण्यात येत आहे.

Canada
Britain Cabinet: सुएला ब्रेव्हरमन यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान...

दरम्यान, कॅनडात घडलेल्या या घटनेबाबत भारत सरकारनो कॅनडा सरकारकडे निषेध व्यक्त केला आहे. पण खलिस्तान समर्थक आणि खलिस्तान चळवळीशी संबंधित लोकांवर कोणतीही कठोर कारवाई करण्यात आली नाही. भारत सरकारने काही दिवसांपूर्वी हेट क्राइमबाबत एक अॅडव्हायजरीही जारी केली होती. यात भारतीय समुदायातील लोकांना सावध राहण्याची सूचना करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com