PM Narendra Modi: अल जझीरामध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात हिंदू राष्ट्रवाद ही जगासाठी एक नवीन समस्या असल्याचे म्हटले आहे. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि विश्व हिंदू परिषदेवर हिंदू उजव्या विचारसरणीचा जगात प्रसार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अलीकडेच, ब्रिटनमधील लीसेस्टरमध्ये घडलेल्या घटनेमागे अल जझिरानेही हे कारण मानले आहे. हिंदुत्वाचा प्रचार, राजकीय तत्त्वज्ञान पूर्णपणे नव्या पद्धतीने समोर येत असल्याचेही अल जझिराने म्हटले आहे. विशेष म्णजे, त्याची मुळे भारतीय शहरांतील रस्त्यांवरील हिंसाचाराशी निगडित असल्याचे देखील म्हटले आहे.
दरम्यान, हा लेख सोमदीप सेन यांनी लिहिला आहे. सोमदीप डेन्मार्कमधील रोस्किल्ड विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विकास अभ्यासाचे सहायक प्राध्यापक आहेत. त्यांनी लिहिले की, '17 सप्टेंबर रोजी एक हिंदू (Hindu) तरुण लेस्टरच्या रस्त्यावर जय श्री रामचा जयघोष देत होता. हे आता हिंदू राष्ट्रवाद्यांच्या युद्धासारखे झाले आहे. हा कडवा हिंदू अभिमान आणि आंधळी-देशभक्ती आहे.'
लंडनमधील या घटनेचा उल्लेख या लेखात
ब्रिटनमधील हिंदू राष्ट्रवाद आणि कंझर्व्हेटिव्ह पार्टी यांच्या सहकार्याचा इतिहास खूप जुना आहे, असे लेखात पुढे लिहिले आहे. विशेष म्हणजे, त्यात 2016 च्या लंडनच्या महापौरपदाच्या निवडणुकीचाही उल्लेख आहे. त्यानुसार तत्कालीन कंझर्व्हेटिव्ह उमेदवार जॅक गोल्डस्मिथ यांनी मजूर पक्षाचे उमेदवार सादिक खान यांचा पराभव करण्यासाठी मुस्लिमविरोधी (Muslim) मोहीम चालवली होती.
इतकेच नाही तर, 2019 च्या यूकेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये हिंदू राष्ट्रवादी गटांनी कंझर्व्हेटिव्ह उमेदवाराच्या विरोधात प्रचार केल्याचे वृत्त आहे, असेही लेखात म्हटले आहे. त्यावेळी त्यामागचे कारण असे देण्यात आले होते की, लेबर पार्टीचे उमेदवार जेरेमी कॉर्बिन यांनी काश्मीरमधील कारवाईबाबत मोदी सरकारवर (Modi Government) टीका केली होती.
अमेरिकेशी देखील जोडलेले आहे
सोमदीपने पुढे लिहिले आहे की, 'ही आता केवळ ब्रिटनची समस्या नाही. हिंदू राष्ट्रवादाचा प्रश्न आता जागतिक झाला आहे.' त्यांनी पुढे लिहिले की, 'ब्रिटनप्रमाणेच अमेरिकेतही हिंदू राष्ट्रवादी उजव्या विचारसरणीच्या उमेदवारांसाठी प्रचार करत आहेत.' त्यांनी 2016 चे उदाहरण दिले. त्यांच्या मते, अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन उमेदवारासाठी हिंदू गटांनी हिंदू अमेरिकन लोकांना एकत्र केले होते.
शेवटी लेखात असे लिहिले आहे की, 2015 मध्ये भारतीय अमेरिकन लॉबी 'रिपब्लिकल हिंदू कोलिशन' नावाने सुरु करण्यात आली होती. सोमदीपच्या म्हणण्यानुसार, हे शिकागोस्थित उद्योगपती शलभ कुमार यांनी लॉन्च केले होते, ज्यांचे मोदींशी जवळचे संबंध आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.