शिंजो आबेंच्या हत्येनंतर VVIP लोकांच्या सुरक्षेसाठी मोदी सरकारच्या राज्यांना सूचना

अलीकडेच , जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हत्येनंतर, भारतातील राजकीय लोकांच्या सुरक्षेबाबतही चर्चा रंगल्या
VVIP Secuirty
VVIP SecuirtyDainik Gomantak

VVIP Secuirty: अलीकडेच , जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हत्येनंतर, व्हीव्हीआयपी सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले गेले. आबे यांची कडक सुरक्षा असूनही त्यांना मारेकऱ्याने गोळ्या घातल्या. एक गोळी झाडण्यात अयशस्वी झाल्यानंतरही तेथील सध्याचे सुरक्षा कर्मचारी त्याला रोखू शकले नाहीत आणि त्यांनी दुसरी गोळी झाडून आबे जखमी केले. त्यानंतर देशात राजकीय लोकांच्या सुरक्षेबाबतही चर्चा रंगल्या होत्या.

भारतातही जपानमधील माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या सार्वजनिक हत्येपासून धडा घेत केंद्र सरकारने व्हीव्हीआयपी सुरक्षेबाबत राज्यांना नव्या सुचना पाठवल्या आहेत. या सुचनेमध्ये राज्यांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. या 5 कलमी सुचनेत व्हीव्हीआयपी सुरक्षेबाबत हाय अलर्ट राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामध्ये समोरून तसेच मागूनही सुरक्षेकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. शिंजो आबे यांना तरुणाने मागून गोळ्या झाडल्या होत्या. 8 जुलै रोजी जपानमध्ये माजी पंतप्रधानांच्या हत्येनंतर काही तासांतच केंद्र सरकारने व्हीव्हीआयपी सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्यासाठी राज्यांना हा सुचना दिल्या आहेत.

VVIP Secuirty
Global Condom Market: जगभरात कंडोम मार्केट वधारणार; भारत,चीनमधुन अधिक मागणी

व्हीव्हीआयपींच्या मागे असलेल्या सर्व लोकांवर सुरक्षा कर्मचारी लक्ष ठेवून असतात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आदेशांमध्ये विशेष पाच मुद्दे सांगण्यात आले आहेत. व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष द्यावे, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. जेव्हा व्हीव्हीआयपी मंचावर बसतात तेव्हा मागून सर्व लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात यावेत, असे केंद्राने म्हटले आहे. विशेषत: निवडणूक रॅलींमध्ये अशी व्यवस्था करायला हवी. खरे तर व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेमध्ये सर्वाधिक लक्ष त्यांच्या पुढच्या भागावर असते, त्यामुळे अनेक वेळा मागच्या बाजूने सुरक्षेकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

लोकांच्या हालचालींवर लक्ष ठेवा

व्हीव्हीआयपींजवळ जमाव येऊ नये, यासाठी कडक पावले उचलण्याची सूचनाही या पत्रात करण्यात आली आहे. व्हीव्हीआयपींच्या जवळ कोण येतंय? यावर बारीक लक्ष ठेवा. व्हीव्हीआयपीकडे जाणाऱ्या रस्त्याची कसून चौकशी करून तिथून येणाऱ्या लोकांच्या हालचालींवर लक्ष ठेवले पाहिजे. सुरक्षा कर्मचार्‍यांनी देखील परिसराच्या जवळ जाण्याची परवानगी दिली जाणार नाही याची काळजी घ्यावी, असे सरकारने म्हटले आहे. व्हीव्हीआयपींच्या जवळ राहणाऱ्या लोकांचीही कसून चौकशी झाली पाहिजे. सुरक्षा कर्मचार्‍यांनी तेथे नेहमी उपस्थित राहून जवळच्या लोकांवरही लक्ष ठेवले पाहिजे, अशा प्रकारचे आदेश या पत्रात देण्यात आले आहे.

VVIP Secuirty
गुजरात सरकार अस्थिर करण्यासाठी तिस्ता सेटलवाडने काँग्रेससोबत रचला कट, SITचा आरोप

विशेषत: कोणतेही शस्त्र सापडण्याची शक्यता असताना व्हीव्हीआयपींच्या सामानाचीही तपासणी करण्यात यावी, असे या पत्रात म्हटले आहे. व्हीव्हीआयपींच्या अंतर्गत परिघातील सुरक्षा कर्मचार्‍यांनी 360-डिग्री पाळत ठेवली पाहिजे, असे या नव्या निर्देशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. व्हीव्हीआयपींच्या भेटीपूर्वी सरप्राईज ड्रिल करून सुरक्षा व्यवस्थेची चाचणी घ्यावी. काही झालेच तर व्हीव्हीआयपींना सुरक्षित रुग्णालयात कसे घेऊन जायचे, याचाही आराखडा अगोदर तयार करायला हवा, अशा आवश्यक सुचना या पत्रात देण्यात आल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com