Pakistan: हिंदू मुलीचे अपहरण केले, पण न्यायालयाने आरोपीच्या बाजूने दिला निकाल

पीडित कुटुंबाने मुलगी अल्पवयीन असल्याचे सांगूनही न्यायालयाने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही.
Pakistan
Pakistan Dainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तान मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिंदू मुलीचे अपहरण केले तरीही कराचीतील न्यायालयाने अपहरण करणाऱ्या व्यक्तीच्या बाजूने निकाल दिला आहे. या संपूर्ण प्रकरणात पीडित कुटुंबाने मुलगी अल्पवयीन असल्याचे सांगूनही न्यायालयाने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. सिंध प्रांतातील हैदराबाद शहरातून 13 ऑक्टोबर रोजी 15 वर्षीय मुलीचे शमन मगसी बलोच नावाच्या व्यक्तीने अपहरण केले होते.

Pakistan
Relationships: धोका, धोका, धोका! आईनेच केली मुलीची फसवणूक, प्रियकरासोबत...

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीचे अपहरण केल्यानंतर तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती केली. तसेच, तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. न्यायालयात हजर केल्यानंतर मुलीला कराची येथील निवारागृहात पाठवण्यात आले आहे. मात्र, आरोपी शामन मगसी बलोचवर याच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

न्यायालयाने मुलीला पालकांसोबत जाऊ दिले नाही. तसेच, निर्णयानंतर मुलीने आई-वडिलांना मिठी मारली अन् सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. यावर अनेकांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Pakistan
Giorgia Meloni: इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान मेलोनी यांनी घेतली शपथ

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर न्यायालयाने आपल्या निर्णयात बदल केला. न्यायालयाने पीडित मुलीला सुरक्षित गृहात जाऊन वैद्यकीय चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. पीडीत मुलीच्या आईला याबाबत विचारले असता, मुलीच्या आईने त्यांचा व्यवस्थेवर विश्वास नाही असे म्हटले आहे.

याशिवाय पाकिस्तानमध्ये अजून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले आहे. संबधित मुलींच्या पालकांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com