12 दिवसांच्या अंतराळ दौऱ्यावरून ते पृथ्वीवर परतले

युसाकू माएझावा (Yusaku Maezawa) यांनी 'सोयुझ' या अंतराळयानाने अंतळाल (Space) दौरा केला.
Space 

Space 

Dainik Gomantak 

Published on
Updated on

जपानी अब्जाधीश युसाकू माएझावा 12 दिवसाच्या अंतळाल दौऱ्यावरून सोमवारी पृथ्वीवर परतले. ते 12 दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहिले, असे रशियाची अंतराळ संस्था रोसकॉसमॉसने सांगितले.

<div class="paragraphs"><p>Space&nbsp;</p></div>
आतापर्यंत या 10 देशांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, काय आहे कारण?

युसाकू माएझावा (Yusaku Maezawa) यांनी 'सोयुझ' या अंतराळयानाने अंतळाल (Space) दौरा केला. एका दशकापेक्षा जास्त कालावधीत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (International Space Station) प्रवास करणारे ते पहिले अंतराळ पर्यटक ठरले. त्यांनी आपल्या सहलीतील फोटो व व्हीडियो सोशल मीडियावर (Social Media) शेयर केले. या मध्ये शून्य गुरुत्वाकर्षणात चहा कसा बनवायचा हे दर्शविणारे व्हिडिओ देखील आहेत. स्पेस स्टेशनवरून दिलेल्या मुलाखतीत माएझावा म्हणाले की, "एकदा तुम्ही अंतराळात गेलात की, हा आश्चर्यकारक अनुभवाची किंमत तुमच्या लक्षात येईल."

<div class="paragraphs"><p>Space&nbsp;</p></div>
प्रादेशिक शांततेसाठी काश्मिरी प्रश्नाचं निराकरण आवश्यक :पाकिस्तानी लष्करप्रमुख

सहलीसाठी त्यांनी $80 दशलक्ष (€71 दशलक्ष) पेक्षा जास्त पैसे मोजले या दाव्याबद्दल विचारले असता, माएझावा म्हणाले की, मी अचूक रक्कम उघड करू शकत नाही परंतु मी हे कबूल करतो की मी "भरपूर पैसे" दिले. माएझावा 2023 मध्ये चंद्राला (Moon) भेट देणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com