प्रादेशिक शांततेसाठी काश्मिरी प्रश्नाचं निराकरण आवश्यक :पाकिस्तानी लष्करप्रमुख

देशाचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा (Qamar Javed Bajwa) यांनी रविवारी सांगितले की, प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी काश्मीर समस्येचे निराकरण आवश्यक आहे.
Qamar Javed Bajwa

Qamar Javed Bajwa

Dainik Gomantak 

Published on
Updated on

दहशतवादामुळे अशांतता पसरवणाऱ्या पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरी राग आवळला आहे. देशाचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा (Qamar Javed Bajwa) यांनी रविवारी सांगितले की, प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी काश्मीर समस्येचे निराकरण आवश्यक आहे. सौदीचे परराष्ट्र मंत्री फैसल बिन फरहान अल सौद (Faisal bin Farhan Al-Saud) यांच्या भेटीदरम्यान जनरल बाजवा यांनी ही माहिती दिली. अफगाणिस्तानातील (Afghanistan) मानवतावादी परिस्थितीवर इस्लामिक सहकार्य संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या 17 व्या सत्रादरम्यान सौद यांनी बाजवा यांची भेट घेतली होती.

दरम्यान, लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, दोघांनी समान हिताच्या मुद्द्यांवर, प्रादेशिक सुरक्षा, अफगाणिस्तानातील सद्यस्थिती (Afghanistan Situation) आणि द्विपक्षीय संरक्षण संबंधांवर चर्चा केली. निवेदनानुसार, जनरल बाजवा यांनी "दक्षिण आशियातील स्थैर्यासाठी काश्मीर वादाचे शांततापूर्ण निराकरण आवश्यक आहे" यावर जोर दिला आणि प्रादेशिक शांतता आणि समृद्धी लक्षात घेऊन पाकिस्तान आपल्या सर्व शेजाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध आवश्यक असल्याचा पुनरुच्चार केला आहे.

<div class="paragraphs"><p>Qamar Javed Bajwa</p></div>
देश सोडणाऱ्यांना तालिबान्यांचा दिलासा, पासपोर्ट जारी करण्यास केली सुरुवात

भारताने पाकिस्तानला वारंवार इशारा दिला आहे

दहशतवाद आणि हिंसाचारापासून मुक्त वातावरणात इस्लामाबादसोबत सामान्य संबंध हवे आहेत, असेही भारताने (India) पाकिस्तानला नेहमीच सांगितले आहे. मात्र, जेव्हाही पाकिस्तान काश्मीरच्या मुद्द्यावर आकस्मिकपणे बोलतो तेव्हा भारत हा भारताचा अंतर्गत विषय (India Pakistan Kashmir) असल्याची तीव्र शब्दांत आठवण करुन देतो. आणि यात हस्तक्षेप करण्याचा पाकिस्तानला अधिकार नाही. याआधी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी आणि पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनाही वेगवेगळ्या प्रसंगी काश्मीरी राग आवळला आहे.

पाकिस्तानला अफगाणिस्तानची चिंता का आहे?

पाकिस्तानने आता तालिबानशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न तीव्र केले आहेत, तसेच अफगाणिस्तानबाबत वारंवार बैठकाही घेतल्या आहेत. हे करण्यामागचा हेतू प्रत्यक्षात अफगाणिस्तानातील परिस्थिती सुधारणे हा नसून तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) म्हणजेच स्थानिक पाकिस्तानी तालिबानच्या हल्ल्यांपासून स्वतःचे संरक्षण करणे हा आहे. जी अफगाणिस्तानची (Local Pakistan TTP) भूमी वापरुन पाकिस्तानवर हल्ला करत आहे. शाह मेहमूद कुरेशी यांनी अलीकडेच ओआयसी परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेपूर्वी अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुट्टाकी यांच्याशी चर्चा केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com