हमजा शरीफ बनले पंजाबचे मुख्यमंत्री

पाकिस्तानचे (Pakistan) नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा मुलगा हमजा शहबाज शरीफ यांनी पंजाब प्रांताची जबाबदारी स्वीकारली.
Hamza Sharif
Hamza SharifDainik Gomantak

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा मुलगा हमजा शहबाज शरीफ यांनी पंजाब प्रांताची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर पाकिस्तानच्या राजकारणात त्यांच्या घराण्याची पकड मजबूत झाली आहे. पंजाबच्या मुख्यमंत्रिपदासाठी आठवड्याभरातील गतिरोधानंतर हमजा शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी शनिवारी देशातील सर्वात श्रीमंत, सर्वाधिक लोकसंख्या असलेला आणि राजकीयदृष्ट्या प्रभावशाली प्रांत असलेल्या पंजाबच्या (Punjab) मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली.(Hamza Sharif son of Prime Minister Shehbaz Sharif has been sworn in as the Chief Minister of Punjab)

दरम्यान, मुख्यमंत्रिपदासाठी पाकिस्तान मुस्लिम लीग-क्यू (PML-Q) चे उमेदवार परवेझ इलाही आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते हमजा शाहबाज यांच्यात मुख्य लढत होती. हमजा हे पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे पुत्र आहेत. यापूर्वी इम्रान खान यांचे निकटवर्तीय उस्मान बुजदार हे मुख्यमंत्री होते. 2018 मध्ये ते मुख्यमंत्री बनले होते, परंतु इम्रान खान सत्तेतून गेल्यानंतर त्यांचेही पद गेले.

डॉनच्या वृत्तानुसार, लाहोर (Lahore) उच्च न्यायालयाने बुधवारी राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांची निवड करण्याचे आदेश दिले होते. सरन्यायाधीश अमीर भाटी यांनी उपसभापती मजारी यांना 16 एप्रिल रोजी मुख्यमंत्रीपदाची निवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते.

Hamza Sharif
तालिबानने बाल्ख विद्यापीठातील 50 प्राध्यापकांना दिला नारळ, मौलवींना केलं नियुक्त

तसेच, पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर 47 वर्षीय हमजा शरीफ म्हणाले की, पंजाबमधील एक महिन्यापासून सुरु असलेले राजकीय संकट आज संपले आहे. ते पुढे म्हणाले की, मी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे मार्गदर्शन घेईन आणि युतीच्या भागीदारांनाही विश्वासात घेईन. पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रीपदी हमजा शरीफ यांची नियुक्ती माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचा मुलगा बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नियुक्तीनंतर काही दिवसांनी झाली आहे. 33 वर्षीय बिलावल भुट्टो झरदारी आता जगातील सर्वात तरुण परराष्ट्र मंत्री बनले आहेत.

Hamza Sharif
UN मध्ये तालिबान्यांनी सुहेल शाहीनला प्रतिनिधी म्हणून केले नियुक्त

याशिवाय, तीन वेळा पंतप्रधान राहिलेले नवाझ शरीफ यांच्यासह संपूर्ण कुटुंब भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रिंगच्या अगणित आरोपांमध्ये अडकले आहे. तसेच हमजा शरीफही या प्रकरणात अपवाद नाही. त्यांच्यावर अनेक वेळा मनी लाँड्रिंगचे आरोपही झाले आहेत. मात्र, शरीफ कुटुंबाने नेहमीच हे आरोप फेटाळून लावले असून हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा युक्तिवाद केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com