ब्राझीलमध्ये मोठा निष्काळजीपणा! नवजात बाळांना देण्यात आली कोरोना लस

ब्राझिलियन मीडिया रिपोर्ट्सनुसार, लस मिळाल्यानंतर दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागले (Vaccine administred to 2 babies).
babies
babiesDainik Gomantak
Published on
Updated on

ब्राझीलमध्ये (Brazil) एक मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. खरं तर, दक्षिण अमेरिका खंडात असलेल्या या देशात, दोन नवजात मुलांना चुकून कोरोनाची लस (Coronavirus Vaccine) देण्यात आली आहे. ब्राझिलियन मीडिया रिपोर्ट्सनुसार, लस मिळाल्यानंतर दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागले (Vaccine administred to 2 babies). हे लक्षात घेण्यासारखे आहे की, जगातील बहुतेक लोक 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लसीकरण करत आहेत. लस हे कोरोनाशी लढण्यासाठी सर्वात प्रभावी शस्त्र आहे, त्यामुळे जगभरात वेगाने लसीकरण केले जात आहे.

UOL मीडिया आउटलेटच्या अहवालानुसार, दोन महिन्यांच्या बाळाला आणि चार महिन्यांच्या बाळाला घटसर्प, टिटॅनस (लॉकजॉ), पेर्ट्युसिस (डांग्या खोकला) आणि हिपॅटायटीस बी विरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी लस देण्याऐवजी कोरोनाची लस दिली. दोन्ही नवजात बालकांना फायझर लस (Pfizer Vaccine) देण्यात आली आणि त्यामुळे दोघांनाही गंभीर रिएक्शन समोर येऊ लागल्या आहेत. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. ज्या नर्सने मुलांना ही लस दिली होती, तिला तत्काळ निलंबित करण्यात आले.

babies
कोरोना व्हॅक्सिनचं AIDS कनेक्शन, 'या' देशाचे राष्ट्राध्यक्ष गोत्यात

ब्राझीलच्या आरोग्य नियामकांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या

ही बाब उघडकीस आल्यानंतर प्रशासनाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. फाइझर लस 5 वर्षाखालील मुलांसाठी अनेक देशांमध्ये मंजूर करण्यात आली आहे. त्याच वेळी, ब्राझीलच्या आरोग्य नियामक अन्विसा (Anvisa) यांनी 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी जूनमध्ये Pfizer/BioNtech Covid-19 लस मंजूर केली. यादरम्यान अन्विसाच्या वरिष्ठ व्यवस्थापनाला जीवे मारण्याची धमकी दिल्याने बराच वाद झाला. ईमेलद्वारे धमक्या देण्यात आल्या असून लसीकरणास मान्यता दिल्यास व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांना मारले जाईल, असेही सांगण्यात आले.

जैर बोलसोनारो यांनी या लसीबाबत वादग्रस्त विधान केले होते

सुरुवातीला ब्राझीलमध्ये लसीकरणाबाबत लोकांमध्ये प्रचंड संकोच होता. त्यामागील कारण म्हणजे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो (Jair Bolsonaro) यांनी लसीबाबत दिलेले विधान. वास्तविक, बोल्सोनारो यांनी लस दिल्यानंतर प्राणी बनल्यासारखे होते असे विधान केले होते. त्याच वेळी, 24 ऑक्टोबर रोजी ते म्हणाले, 'ब्रिटिश सरकारच्या अधिकृत अहवालात असे म्हटले आहे की, ज्या लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत, त्यांना 'अ‍ॅक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम' (AIDS) होत आहे. त्यांच्या या वक्तव्याविरुध्द सर्वोच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com