कोरोना व्हॅक्सिनचं AIDS कनेक्शन, 'या' देशाचे राष्ट्राध्यक्ष गोत्यात

राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो (Jair Bolsonaro) यांच्या कोविड-19 (Covid-19) लसीचा एड्सशी संबंध जोडणाऱ्या विधानाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Jair Bolsonaro
Jair BolsonaroDainik Gomantak

ब्राझीलच्या (Brazil) सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो (Jair Bolsonaro) यांच्या कोविड-19 (Covid-19) लसीचा एड्सशी संबंध जोडणाऱ्या विधानाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. बोल्सोनारो यांनी 24 ऑक्टोबर रोजी प्रसारित केलेल्या एका अधिकारीक रिपोर्टमध्ये सांगितले होते की, 'ब्रिटिश सरकारच्या अधिकृत अहवालात असे म्हटले आहे की, ज्या लोकांना लसीचे दोन्ही डोस (Bolsonaro Vaccine Comments) मिळाले आहेत त्यांना 'अ‍ॅक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम' (AIDS) लवकर होऊ शकतो. त्यानंतर Facebook आणि Instagramने काही दिवसांनी त्यांचा व्हिडीओ हटवला होता.

दरम्यान, शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांनीही बोलसोनारोंचा दावा फेटाळून लावला आहे. ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अलेक्झांडर डी मोरेस यांनी देशातील सर्वोच्च सरकारी वकील ऑगस्टो अरास यांना ब्राझीलच्या सिनेटने साथीच्या ((Brazilian President on Covid-19 Vaccines) तपासात केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी अद्याप लसीकरण केलेले नाही आणि ते लसीकरणाच्या आवश्यकतेविरुद्ध बोलत आहेत. बोल्सोनारो म्हणतात की, मी फक्त एका मासिकाच्या लेखाचा हवाला देत आहे.

Jair Bolsonaro
ओमिक्रॉनचं संकट कायमचं, जपानने बूस्टर डोस देण्यास केली सुरुवात

चौकशी होण्याची शक्यता नाही

मोरेस यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, बोलसोनारो यांच्या वक्तव्याची चौकशी करण्यात यावी. मात्र, चौकशी होण्याची शक्यता नाही. सिनेट समितीने विनंती करुनही अरास अध्यक्षांना विरोध करत नाहीत. कोरोनाचा सामना करण्यासाठी बोल्सोनारोंच्या भूमिकेची चौकशी केली नाही. बोल्सोनारो यांनी कोरोना नियमांना सुरुवातीपासूनच आरोग्य नियमांचे उल्लंघन केले आहे. कोरोनाचा प्रसार (Coronavirus in Brazil) रोखण्यासाठी लागू केलेले निर्बंध चांगल्यापेक्षा जास्त नुकसान करतात, असेही त्यांनी म्हटले होते.

सहा लाखांहून अधिक मृत्यू

ब्राझीलमध्ये कोविड-19 मुळे आतापर्यंत 6,10,000 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे आणि या प्रकरणात ते अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. असे असूनही, राष्ट्रपती सतत अशी विधाने करत आहेत (Brazil Covid-19 Situation). यापूर्वी, बोल्सोनारो यांनी कोरोना विषाणूला अगदी किरकोळ फ्लू म्हटले आहे. त्यामुळे त्यांना लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. देशभरातील लोकांनी त्याच्याविरोधात निदर्शनेही केली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com