Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro 06 ऑक्टोबर रोजी यूएस मध्ये लॉन्च होत आहेत. त्याच दिवशी हे फोन भारतातही लॉन्च होणार आहे. गुगल हा फोन फ्लिपकार्टसोबत भारतात लॉन्च करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Google ने Pixel 7 आणि Pixel 7 Pro साठी प्री-बुकिंग टाइमलाइन जाहीर केली आहे. या दोन्ही फोनचे प्री-बुकिंग 06 ऑक्टोबरपासून सुरू होईल.
Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro प्री-बुकिंग 6 ऑक्टोबर रोजी रात्री 9.30 वाजता फ्लिपकार्टवर उपलब्ध असणार आहे. फोनचे लॉन्चिंग 6 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे, त्यामुळे कार्यक्रम संपल्यानंतर प्री-बुकिंगची वेळ सुरू होईल.
Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro किंमत
Pixel 7 ची किंमत Pixel 6 सारखी असू शकते, जी $599 आहे, तर Pixel 7 Pro ची किंमत US मध्ये $899 पासून सुरू होऊ शकते. Pixel 7 ची किंमत रु. 48,900 आणि Pixel 7 Pro ची किंमत रु. 73,400 पासून सुरू होऊ शकते.
गुगलने (Google) या दोन्ही फोनचे कलर ऑप्शन्स भारतात उपलब्ध होणार असल्याचेही माहिती दिली आहे. पिक्सेल 7 ऑब्सिडियन, लेमनग्रास आणि स्नो या तीनही रंगांमध्ये उपलब्ध असेल. Pixel 7 Pro देखील तीन रंगांमध्ये येईल, ऑब्सिडियन, हेझेल आणि स्नो. Pixel फोनच्या सर्व कलर व्हेरियंटची किंमत सारखीच असेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.