Xi Jinping: चिनच्या पंतप्रधानांसह पक्षाच्या चार बड्या नेत्यांना जिनपिंग यांनी पदावरून हटवले

जिनपिंग स्वतः मात्र राष्ट्राध्यक्षपदाची तिसरी टर्म स्विकारणार

Xi Jinping
Xi JinpingDainik Gomantak
Published on
Updated on

Xi Jinping: चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी पंतप्रधान ली केकियांग यांच्यासह चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या चार बड्या नेत्यांना पदावरून हटवले आहे. हे हटवलेले सदस्य आता पुन्हा पॉलिट ब्युरोमध्ये नियुक्त केले जाणार नाहीत.


Xi Jinping
India's Forex Reserves: भारताचा परदेशी चलन साठा दोन वर्षातील निचांकी पातळीवर

16 ऑक्टोबरपासून कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीस सुरवात झाली होती, शनिवारी 22 ऑक्टोबर रोजी या बैठकीचा अखेरचा दिवस होता. बैठकीत सदस्य नव्या मध्यवर्ती कमिटीसाठी मतदान करतात. ही कमिटी पॉलिट ब्युरोच्या सदस्यांची निवड करते.

जिनपिंग यांनी शांघाय पार्टीचे प्रमुख हान झेंग, पक्षाच्या सल्लागार समितीचे प्रमुख वांग यांग आणि नॅशनल पीपल्स काँग्रेसचे प्रमुखच ली झांशु यांनाही पदावरून हटवले आहे. यातील ली झांशु हे जिनपिंग यांचे निकटचे सहकारी मानले जातात.

दरम्यान, या बैठकीत एका महत्वाच्या संवैधानिक दुरूस्तीस मंजुरी देण्यात आली. या दुरूस्तीनुसार क्षी जिनपिंग यांचा नेतृत्वाचा कालावधई आता वाढणार आहे. या बैठकीत जिनपिंग यांच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून तिसऱ्या कार्यकाळाचा प्रस्ताव सादर केला गेला.


Xi Jinping
Rishi Sunak: ऋषी सुनक यांना हुजुर पक्षातील 100 नेत्यांचा पाठिंबा

जिनपिंग यांनी चीनमध्ये स्वतःचे महत्व वाढवले आहे. 2021 मध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत ऐतिहासिक संकल्पपत्र जारी केले गेले होते. त्यानुसार जिनपिंग यांच्या विरोधातील वक्तव्य गुन्हा समजले जाईल, आणि त्यावर शिक्षेची तरतूद केली गेली.

जिनपिंग हे 2012 मध्ये सर्वप्रथम सत्तेत आले होते. जिनपिंग यांच्यापुर्वी सर्व राष्ट्राध्यक्ष हे पाच वर्षांचे दोन कार्यकाळ किंवा 68 वयापर्यंतच पदावर राहु शकत होते. पण 2018 मध्ये ही दोन टर्मची अट काढून टाकली गेली. जिनपिंग यांचा दुसरा कार्यकाळ 2023 मध्ये संपणार आहे, पण ते तिसरी टर्म पण घेणार, असे मानले जात आहे. जिनपिंग आजीवन राष्ट्राध्यक्षपदी राहू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com